घरCORONA UPDATEOmicron Symptoms: AIIMS ने सांगितले ओमिक्रॉनची 5 ची धोकादायक लक्षणे

Omicron Symptoms: AIIMS ने सांगितले ओमिक्रॉनची 5 ची धोकादायक लक्षणे

Subscribe

भारतात कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र कोरोनाचे आत्तापर्यंत आढळलेल्या व्हेरिएंटमची अनेक वेगवेगळी लक्षणे दिसून आली. ओमिक्रॉन व्हेरिएंटबद्दल बोलायचे झाल्यास यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन अॅनालिसिसच्या मते, खोकला, थकवा, कफ आणि नाक वाहणे ही चार सर्वात सामन्य लक्षणे आहेत. अशातच AIIMS (ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स) ने ओमिक्रॉनची पाच घातक लक्षणे जाहीर केली आहेत. तसेच या लक्षणांकडे दुर्लक्ष करुन नका असा इशाराही AIIMS ने दिला आहे. नेमकी ही लक्षणे कोणती आहेत ती जाणून घेऊ…

ओमिक्रॉनची पाच घातक लक्षणे (Omicron)

१) श्वास घेण्यास त्रास होणे.

- Advertisement -

२) ऑक्सिजनची पातळी कमी होणे.

३) छातीत सतत दुखणे, दबाव जाणवणे.

- Advertisement -

४) मानसिक संतुलन बिघडणे किंवा प्रतिसाद न देणे.

५) ही लक्षणे ३ ते ४ दिवसांपेक्षा जास्त दिवस असल्यास वाईट परिस्थिती निर्माण होईल.

तसेच त्वचेचा, ओठांचा आणि नखांचा रंग अचानक बदलला तरी सावध होण्याची गरज असल्याचे आरोग्य तज्ज्ञांनी सांगितले आहे.

चाचणी केव्हा करायची

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, ओमिक्रॉनबाधित रुग्णांच्या संपर्कात आल्यानंतर 5 दिवसांनी किंवा कोणतीही लक्षणे दिसू लागताच त्याची चाचणी करावी लागेल. त्यामुळे लक्षणे दिसलेल्यांचे निगेटिव्ह रिपोर्ट येईपर्यंत त्याला ताबडतोब क्वारंटाईन व्हावे लागेल.

इलिनॉइस डिपार्टमेंट ऑफ पब्लिक हेल्थच्या संचालक डॉ. नगोजी इझीके यांच्या म्हणण्यानुसार, संसर्ग होणे आणि लक्षणे दिसणे यामधील कालावधी बदलू शकतो, परंतु चाचणी करुन काही दिवसांतच रिपोर्च निगेटिव्ह आल्यानंतरही पुन्हा एकदा रिपोर्ट करणे गरजेचे आहे.

जर लक्षणे दिसत असतील आणि तुमची लगेच चाचणी केली असेल आणि चाचणी निगेटिव्ह आली असेल, तर तुम्ही निगेटिव्ह आहात असे समजू नका. कारण कोरोनाची अशी काही लक्षणे आहेत जसे की घसा खवखवणे, डोकेदुखी, सौम्य ताप, अंगदुखी. ही लक्षणे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर तुम्हाला दिसली, तर काही दिवसांनी पुन्हा कोरोना टेस्ट करा.

क्वारंटाईन आणि आयसोलेट केव्हा झाले पाहिजे?

ज्यांना असे वाटते की, ते कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या एखाद्या व्यक्तीच्या संपर्कात आले आहेत आणि लसीकरण केलेले नाही, त्यांनी ताबडतोब स्वतःला क्वारंटाईन करावे. त्यानंतर लक्षणे दिसतात की नाही हे पाहावे. लक्षणे दिसत नसल्यास तज्ज्ञांच्या सल्ल्याने तुम्ही क्वारंटाईनमधून बाहेर पडू शकता. त्याच वेळी, ज्या लोकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, त्यांनी लसीकरण केले असले तरीही, त्यांना त्वरित आयसोलेट झाले पाहिजे.


Covid-19 : यावेळी कोरोना देतोय डोक्याला कमी ताप, सीटी स्कॅनमधून झाला खुलासा


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -