Coronavirus: कोरोनावर मात करण्याचे हत्यार मिळाले भांग, गांज्यात?; पण वैज्ञानिक म्हणाले…

omicron coronavirus covid19 may stop from cannabis weed compounds according to study
Coronavirus: कोरोनावर मात करण्याचे हत्यार मिळाले भांग, गांज्यात?; पण वैज्ञानिक म्हणाले...

जगभरात कोरोनाचा केसेस पुन्हा एकदा झपाट्याने वाढत आहेत. सध्याच्या परिस्थितीत जो व्हेरिएंट हाहाकार माजवत आहे, त्यामध्ये डेल्टा व्हेरिएंट (Delta Variant) आणि ओमिक्रॉन व्हेरिएंटचा (Omicron Variant) समावेश आहे. आज देशात २ लाख ६४ हजार नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. ज्यामुळे देशातील एकूण अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १२ लाख ७२ हजार ७३वर पोहोचली आहे. याशिवाय एकूण ओमिक्रॉन रुग्णांची संख्या ५ हजार ७५३वर पोहोचली आहे. यादरम्यान कोरोनावर वैज्ञानिक सातत्याने संशोधन करत आहेत. अलीकडेच एका नव्या संशोधनानुसार, भांग आणि गांजामधील (Cannabis or weed) काही संयुगे/ कंपाऊंड (Compound) कोरोना रोखू शकतात असे समोर आले आहे. वैज्ञानिकांचे हे संशोधन भांगमधील रासायनिक संयुगांबाबतच्या उपस्थिती संदर्भात बोलणारे आहे, जे व्हायसला निरोगी मानवी पेशींमध्ये प्रवेश करण्यापासून रोखू शकते. काय आहे हे संशोधन जाणून घ्या.

वैज्ञानिकांना संशोधनात काय मिळाले?

ऑरगन स्टेटच्या ग्लोबल हेम्प इनोव्हेशन सेंटर, कॉलेज ऑफ फार्मेसी आणि लिनुस पॉलिंग इन्स्टिट्यूटच्या वैज्ञानिकांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन करण्यात आले आहे. जे जर्नल ऑफ नेचुरल प्रोडक्ट्समध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. दरम्यान संशोधनकर्ते कोणत्याही प्रकारे भांग किंवा गांजा कोरोनापासून बचाव करू शकते असे सांगत नाहीत. पण हे संशोधन भांगच्या २ संयुगे कॅनाबिगेरोलिक अॅसिड किंवा CBGA आणि कॅनाबिडियोलिक अॅसिड किंवा CBDAवर आहे, जे भांगमध्ये आढळते.

ऑरगन हेल्थ अँड सायन्स युनिव्हर्सिटीच्या वैज्ञानिकांसोबत संशोधन करणाऱ्या रिचर्ड वॅन ब्रीमेनमध्ये (Richard Van Breemen) आढळले की, कॅनाबिनोइड अॅसिडची एक जोडी कोरोना व्हायरसच्या स्पाइक प्रोटीनला जोडण्यासाठी सक्षम आहे. तसेच हे एका जैविक प्रक्रियेत एक महत्त्वपूर्ण कदम रोखू शकते, ज्याचा उपयोग व्हायरस लोकांना संक्रमित करण्यासाठी होतो. या संयुगांना ओरल रुपाने म्हणजेच तोंडावाटे घेऊ शकतात. मानवात याचा सुरक्षेसाठी उपयोग होत असल्याचा बऱ्याच काळाचा इतिहास आहे. या संयुगांमध्ये कोरोनाचा संसर्ग रोखण्याचा आणि उपचार करण्याची क्षमता आहे.

वैज्ञानिक म्हणाले की, भांग आणि भांगसारख्या अनेक गोष्टींमध्ये हे कॅनाबिनोइड अॅसिड विपुल प्रमाणात आढळते. हे टेट्राहायड्रोकॅनाबिनोल (THC) म्हणजेच सायकोएक्टिव पदार्थ नाही आहे, जे तुमच्या डोक्यातील नियंत्रण हटवते. आमच्या संशोधनात आढळले आहे की, भांगचे संयुगे ब्रिटनमध्ये पहिल्यांदा आढळलेल्या कोरोना व्हायरस B.1.1.7 (अल्फा) व्हेरिएंट आणि दक्षिण आफ्रिकेत आढळलेला व्हेरिएंट B.1.351 (बीटा) या दोन व्हेरिएंटवर समान स्वरुपात प्रभावी होते.

लस आणि अँटीबॉडीमध्ये होऊ शकतो हा प्रयोग

संशोधनात ज्या संयुगांबाबत बोलले जात आहे, ते कॅनाबिगगेरोलिक अॅसिड आणि कॅनाबिडिऑलिक अॅसिड हे दोन्ही व्हायरसच्या स्पाइक प्रोट्रीनला जोडू शकतात. या संयुगांचा वापर व्हायरसला निशाणा बनवण्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक लस आणि अँटीबॉडीच्या उपचारामध्येही केला जाऊ शकतो.

गांजा फायबर आणि प्राण्यांच्या जेवणाचा एक सोर्स आहे आणि याच्या अर्कचा सहसा सौंदर्य प्रसाधन, बॉडी लोशन, सप्लीमेंट आणि जेवणात वापर केला जातो. गेल्या काही संशोधनात असे आढळले आहे की, कॅनाबिगेरोलिक अॅसिड आणि कॅनाबिडियोलिक अॅसिडने कोरोना व्हायरस असलेल्या लोकांमध्ये एपिथेलियल पेशींचा संसर्ग रोखला होता.


हेही वाचा – Corona: देशात लस उपलब्ध नाही तरीही या देशांनी परत पाठवले लसीचे डोस, काय आहे कारण?