घरताज्या घडामोडीOmicron Variant: अमेरिकेत डेल्टाच्या तुलनेत ओमिक्रॉनमुळे सर्वाधिक मृत्यू

Omicron Variant: अमेरिकेत डेल्टाच्या तुलनेत ओमिक्रॉनमुळे सर्वाधिक मृत्यू

Subscribe

अमेरिकेत कोरोनाचा हाहाकार सुरू आहे. जगभरात वेगाने पसरणाऱ्या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंट ओमिक्रॉनने अमेरिकेच्या प्रशासनांची चिंता आणखीन वाढवली आहे. अमेरिकेत डेल्टाची जागा ओमिक्रॉननी घेतली आहे. डेल्टाच्या तुलनेत ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे अमेरिकेत जास्त मृत्यू होत आहेत. येणाऱ्या दिवसांत ओमिक्रॉन अधिक वाढण्याची शक्यता अमेरिकेच्या प्रशासनाने व्यक्त केली आहे.

अमेरिकेत डेल्टाच्या तुलनेत जास्त पटीने ओमिक्रॉनचा कहर सुरू आहे. ओमिक्रॉन व्हेरिएंट पसरल्यानंतर अमेरिकेत नोव्हेंबर २०२१पासून दैनंदिन मृत्यूचा आकडा झपाट्याने वाढण्यास सुरुवात झाली होती. गुरुवारी अमेरिकेत २ हजार २६७ लोकांचा मृत्यू झाला होता. हा आकडा डेल्टा व्हेरिएंटच्या पीक दरम्यान होणाऱ्या मृत्यूच्या आकड्यापेक्षा खूप जास्त आहे. कारण अमेरिकेत सप्टेंबर २०२१मध्ये जेव्हा डेल्टा व्हेरिएंट पीकला होता, तेव्हा एक दिवसात २ हजार १०० मृत्यूची नोंद होत होती.

- Advertisement -

अमेरिकेत सध्या ओमिक्रॉनचे अधिक रुग्ण आढळत आहे. गेल्या रिसर्च रिपोर्ट्समध्ये जरी ओमिक्रॉन कमी गंभीर सांगितला जात असला तरी, सत्य हे आहे की, ओमिक्रॉन व्हेरिएंट दुसऱ्या व्हेरिएंटच्या तुलनेत जास्त लोकांना संक्रमित करतो. कोरोना मृत्यूच्यासंख्येत जगात अमेरिका पहिल्या स्थानावर आहे. अमेरिकेत कोरोनामुळे ८.७८ लाख जणांचा मृत्यू झाला आहे.

अमेरिकेच्या इरविन शहरची कॅलिफोर्निया युनिवर्सिटीचे प्राध्यापक एंड्रयू नोयमर यांच्यामते अमेरिकेतील एक लाखांहून जास्त मृत्यूचे कारण ओमिक्रॉन आहे. जेव्हा ओमिक्रॉनचा प्रसार कमी होऊ लागेल, तेव्हाच मृत्यू रोखले जाऊ शकतील. ओमिक्रॉनचे लक्षण जास्त करून सौम्य आहेत. काही संसर्गजन्य लोकांमध्ये लक्षणे दिसतही नाहीत. परंतु तो तितकाच घातक आहे. जास्त वयोगटातील लोकांसाठी जीवघेणा असू शकतो.

- Advertisement -

अमेरिकेच्या सेंटर फॉर डिजीज कंट्रोल अँड प्रिवेंशनचे संचालक डॉ. रोशेल वालेंस्की यांनी ओमिक्रॉनाबाबत अलर्ट जारी केला होता. ते म्हणाले होते की, ओमिक्रॉनची लक्षणे सौम्य असली तरी त्याला हलक्यात घेऊ नका. त्यांनी एक व्यक्तीचे उदाहरण देत ओमिक्रॉन किती भयावह आहे, हे सांगितले. ते म्हणाले की, मिलफोर्डच्या डेलावेअरमध्ये राहणाऱ्या चक कुलोटा (वय ५०) आपला व्यवसाय करत होता. तो एक निरोगी व्यक्ती होता. ख्रिसमसच्या अगोदर त्याला कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटची लागण झाली होती. एका आठवड्याच्या आत ३१ डिसेंबरला चकचा मृत्यू झाला.


हेही वाचा – Omicron Sub Variant: पुण्यात दोन चिमुकल्यांना ओमिक्रॉनच्या BA.2 व्हेरिएंटची लागण


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -