घरदेश-विदेशदिल्लीत कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या 97 टक्के नमुन्यांमध्ये आढळला ओमायक्रॉन

दिल्लीत कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या 97 टक्के नमुन्यांमध्ये आढळला ओमायक्रॉन

Subscribe

देशभरात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. राजधानी दिल्लीत कोरोनाने थैमान घातलं असून, रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. शिवाय या कोरोनामुळं अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशातच आता एक धक्कादायक बातमी समोर येत आहे.

देशभरात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. राजधानी दिल्लीत कोरोनाने थैमान घातलं असून, रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. शिवाय या कोरोनामुळं अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशातच आता एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. जानेवारी ते मार्च दरम्यान दिल्लीत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या 97 टक्के नमुन्यांमध्ये कोरोना व्हायरसचा ओमायक्रॉन व्हेरिएंट आढळून आल्याची माहिती समोर येत आहे.

सरकारी आकडेवारीनुसार याबाबत माहिती देण्यात आली आहे. या माहितीनुसार, मृतांच्या गोळा केलेल्या 578 नमुन्यांच्या जीनोम सिक्वेन्सिंगमध्ये असे दिसून आले की त्यापैकी 560 मध्ये ओमायक्रॉन व्हेरिएंट होता. उर्वरित 18 म्हणजे 3 टक्क्यांमध्ये डेल्टासह कोविड-19 चे इतर व्हेरिएंट आढळले. त्यामुळे गेल्या वर्षी एप्रिल आणि मेमध्ये संसर्गाची दुसरी लाट आली होती.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली, उत्तर प्रदेश, मिझोराम, महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये कोरोनाचे नवे रुग्ण खूप वेगानं वाढ आहेत. बुधवारी दिल्लीतील केजरीवाल सरकारने सार्वजनिक ठिकाणी मास्क अनिवार्य केले. बुधवारी देशात 2000 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. दिल्लीत पुन्हा एकदा कोरोनाच्या संसर्गाची संख्या वाढ होत आहे. देशात कोरोना विषाणूची संभाव्य चौथी लाट येण्याची भीती वाढली आहे.

आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी तीन राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश दिल्ली यांना गर्दीच्या ठिकाणी मास्क घालण्यावर विशेष भर देऊन कोरोना नियमांचं पालन करण्याचे निर्देश दिले. दिल्लीशिवाय उत्तर प्रदेश, हरियाणा आणि चंदीगडमध्येही मास्क परत लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दिल्लीत गेल्या 24 तासांत सलग दुसऱ्या दिवशी 500हून अधिक नवीन रुग्ण आढळले आहेत.

- Advertisement -

उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने सोमवारी राज्याची राजधानी लखनऊसह राज्यातील 7 शहरांमध्ये मास्क घालणे बंधनकारक असल्याची घोषणा केली. यूपी सरकारने गौतम बुद्ध नगर, गाझियाबाद, मेरठ, बुलंदशहर, बागपत आणि लखनऊमध्ये सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे अनिवार्य केले आहे.


हेही वाचा – पाकिस्तान आणि चीनचा डर्टी हनीट्रॅप गेम, रडारवर भारताचे लष्कर अधिकारी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -