घरक्राइमOmicron-ओमीक्रॉन सर्वांना मारून टाकणार ! चिठ्ठी लिहीत डॉक्टरने केली पत्नीसह दोन मुलांची...

Omicron-ओमीक्रॉन सर्वांना मारून टाकणार ! चिठ्ठी लिहीत डॉक्टरने केली पत्नीसह दोन मुलांची हत्या

Subscribe

जगभरात खळबळ उडवणारा कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमीक्रॉनने भारतातही एन्ट्री केल्याने देशभरात दहशतीचे वातावरण आहे. याचदरम्यान, ओमीक्रॉनच्या धास्तीने उत्तर प्रदेशमधील कानपूर येथे एका डॉक्टरनेच पत्नी आणि दोन मुलांची हातोड्याने ठेचून निर्घृण हत्या केल्याची भयंकर घटना घडली आहे. आरोपी डॉक्टर फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

पोलिसांना घटनास्थळी डॉक्टरने लिहलेली एक चिठ्ठी सापडली. ”त्यात मी एका असाध्य आजाराने ग्रस्त असून माझ्या कुटुंबाला संकटाचा एकटा सामना करण्यासाठी सोडून जाऊ शकत नाही. यामुळे त्या सगळ्यांना मुक्तीच्या मार्गावर सोडून जात आहे. ज्यामुळे एका क्षणात त्यांचे सर्व कष्ट दूर होतील. असेही लिहण्यात आले असून पुन्हा मृतदेह मोजायचे नाहीयेत. ओमीक्रॉन सगळ्यांचा जीव घेणार आहे. असेही डॉक्टरने लिहले आहे. या आरोपी डॉक्टरचे नाव सुशील कुमार असून तो इंदीरा नगर डिविनिटी अपार्टमेंट येथे पत्नी चंदप्रभा (४८) मुलगा शिखर (१८) आणि पंधरा वर्षाच्या मुलीसोबत राहत होता. विशेष म्हणजे डॉक्टर कानपुर येथील रामा मेडिकल कॉलेजच्या फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख आहे. पत्नी आणि मुलांची हत्या केल्यानंतर डॉक्टर सुशीर याने भावाला मेसेज करून केलेल्या कृत्याची कबुली दिली आणि पोलिसांना घरी पाठवण्यास सांगितले. पण पोलीस घटनास्थळी पोहचले तेव्हा डॉक्टरची पत्नी व मुले रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती. तसेच त्यांच्या मृतदेहाशेजारीच रक्ताने माखलेला हातोडा पोलिसांना सापडला आहे. तर डॉक्टर सुशील फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. ओमीक्रॉनच्या धास्तीने डॉक्टरने कुटुंबाची हत्या केल्याचा गुन्हा त्याच्यावर नोंदवण्यात आला आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -