घरCORONA UPDATEOmicron Variant : ब्रिटनमध्ये कोरोनाचा हाहाकार! २४ तासात सापडले १ लाखांहून अधिक...

Omicron Variant : ब्रिटनमध्ये कोरोनाचा हाहाकार! २४ तासात सापडले १ लाखांहून अधिक रुग्ण

Subscribe

गेल्या अनेक दिवसांपासून देशासह जगभरात ओमिक्रॉन व्हेरिएंटची दहशत पाहायला मिळतेय. मात्र ब्रिटनमध्ये ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या एन्ट्रीनंतर कोरोनाची रुग्णांची संख्या दिवसागणित दुप्पट होतेय. ब्रिटनमध्ये सध्या कोरोनाने हाहाकार उडवून दिला आहे. एका दिवसात कोरोनाचे एक लाखाहून अधिक पॉझिटिव्ह रुग्ण समोर आलेत. देशात पहिल्यांदाच दैनंदिन रुग्णसंख्या १ लाखांच्या वर पोहचली आहे. ब्रिटनमध्ये डेल्टा व्हेरिएंटनंतर ज्याप्रमाणे रुग्णसंख्या वाढत होती त्याचप्रमाणे आता ओमिक्रॉनमुळे देखील रुग्णसंख्या वाढतेय.

ब्रिटनमध्ये गेल्या आठवड्यात कोरोनाचे सर्वाधिक म्हणजे ९३,०४५ रुग्ण होते. ब्रिटनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, मात्र बुधवारी २४ तासांत १ लाख १२२ हजार कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यासह गेल्या २८ दिवसांत कोरोनाने १४० रुग्णांचा जीव घेतला. कोरोनाच्या शेवटच्या लाटेत ब्रिटनमध्ये सर्वाधिक रुग्णांची संख्या ६८ हजारांवर पोहोचली आहे.

- Advertisement -

ब्रिटनमध्ये सतत वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे ब्रिटन सरकराने नागरिकांना लसीचा बूस्टर डोस घेण्याचे आवाहन केले आहे. ब्रिटनमध्ये आत्तापर्यंत ३० दशलक्ष नागरिकांनी लसीचा बुस्टर डोस घेतला आहे. तर पाच ते ११ वयोगटातील मुलांसाठी फायझर लसीला मंजुरी दिली आहे.

ब्रिटनमध्ये संसर्ग रोखण्यासाठी अँटीव्हायरलची खरेदी

ब्रिटन सरकारने बुधवारी माहिती दिली की, कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटशी लढण्यासाठी आणखी लाखो अँटीव्हायरल खरेदी केले आहेत. या खरेदी करारावर स्वाक्षरी झाली आहे. पुढच्या वर्षीच्या सुरुवातीपर्यंत ही औषध उपलब्ध होतील. अँटीव्हायरल औषध कोरोनावर प्रभावी ठरत असल्याचे म्हटले जाते.

- Advertisement -

फ्रान्समध्ये ८४२७२ नवीन कोरोना रुग्णांची नोंद

ब्रिटननंतर फ्रान्समध्येही बुधवारी गेल्या २४ तासांत ८४२७२ नव्या कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. फ्रान्सच्या आरोग्यमंत्र्यांनी सांगितले की, या महिन्याच्या अखेरीस १००,००० हून अधिक नव्या रुग्णांची नोंद होऊ शकते.

भारतात पुन्हा कडक निर्बंध

जगभरात ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या दहशतीमुळे भारतातही कडक उपाय योजना, निर्बंध केले जात आहेत. यातत मुंबईसह आता देशाची राजधानी दिल्लीतही नाताळ सेलिब्रेशन तसेच न्यू ईयर पार्टी व अन्य सर्वच कार्यक्रमांवर निर्बंध घातले आहेत. दिल्ली आपत्ती व्यवस्थापन विभागाने याबाबतचा आदेश काल जारी केला आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -