घरताज्या घडामोडीOmicron : ओमिक्रॉनचा नवा भाऊ सापडला, 80 टक्के प्रकरणात BA.2 स्ट्रेनचा संसर्ग

Omicron : ओमिक्रॉनचा नवा भाऊ सापडला, 80 टक्के प्रकरणात BA.2 स्ट्रेनचा संसर्ग

Subscribe

कोरोनाबाधित रुग्णांची संख्येने एक लाख पार केले आहेत. 24 तासांत आणखी 19 बाधितांचा मृत्यू झाला आहे. या 19 कोरोनाबाधितांच्या रुग्णांपैकी 6 मृत्यू कोलकत्ता येथे झाले आहेत. दरम्यान, कोलकत्तामधील प्रयोगशाळेत या रुग्णांचे रिपोर्ट जीनोम सीक्वेसिंगसाठी पाठवण्यात आले

देशभरात पुन्हा एकदा कोरोनाचे संकट डोके वर काढत आहे. त्यातच कोलकत्ता आणि पश्चिम बंगालमध्ये मंगळवारी कोरोनाची 21,098 ही कोरोनाची नवी प्रकरणे आढळली आहेत. कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येने एक लाख पार केले आहेत. 24 तासांत आणखी 19 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. या 19 कोरोनाबाधितांच्या रुग्णांपैकी 6 रुग्णांचे मृत्यू कोलकत्ता येथे झाला आहे. दरम्यान, कोलकत्तामधील प्रयोगशाळेत या रुग्णांचे रिपोर्ट जीनोम सीक्वेसिंगसाठी पाठवण्यात आले असून, यामधील 80 टक्के कोरोनाच्या प्रकरणात BA.2 स्ट्रेन हा ओमिक्रॉनचा नवा व्हेरिएंट सापडला आहे. त्यामुळे नागरिकांमधील चिंता वाढली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 22 ते 28 डिसेंबर दरम्यान, जीनोम सिक्वेन्सिंगसाठी नमुने पाठवण्यात आले होते. सुमारे 80 टक्के नमुन्यांमध्ये Omicron चे BA.2 स्ट्रेन आढळले आहे. कोलकाता येथील प्रयोगशाळेने पाठवलेल्या 34 नमुन्यांमध्ये BA.2 ची पुष्टी झाली आहे. याशिवाय एका नमुन्यात ओमिक्रॉन BA.1 तर 8 नमुन्यांमध्ये डेल्टा आणि डेल्टा प्लस प्रकार आढळून आले. दुसऱ्या प्रयोगशाळेने पाठवलेल्या 17 पैकी 14 कोरोना नमुन्यांमध्ये Omicron चे BA.2 आढळले आहे. बाकीचे नमुने डेल्टा प्रकारातील होते. तिसर्‍या प्रयोगशाळेने पाठवलेल्या 50 नमुन्यांच्या चाचणीत 35 नमुने ओमिक्रॉनच्या BA.2 स्ट्रेनचे असल्याचे दिसून आले. डिसेंबरमध्येच सरकारने त्या सर्व कोरोना पॉझिटिव्ह नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्याचा निर्णय घेतला होता. ज्यांचे सीटी लेवल 30 पेक्षा कमी आहे. Omicron च्या वाढत्या प्रादुर्भावामुळए समुदाय प्रसाराची भीती जाणून घेण्यासाठी हे केले गेले. या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा प्रसार वेगाने होत आहे.

- Advertisement -

कोरोना उपचारावरील मोलनुपिरावीर औषध संततीसाठी धोकादायक

कोरोनावर उपचार करण्यासाठी मोलनुपिरावीर या औषधाला मान्यता मिळाली आहे. परंतु हे औषध होणाऱ्या संततीसाठी धोकादायक असल्याचा दावा आयसीएमआरने केला आहे. ICMR च्या तज्ञांनी सुरक्षेच्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. तसेच यामुळे औषधांच्या यादीतून वगळण्यात येत आहे. हे औषध फायद्याचे असले तरी ते महिलांना देण्यात येऊ नये असा सल्ला इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) टास्क फोर्सने दिला आहे.देशात कोरोनाबाधितांची संख्या वाढली आहे. कोरोनाबाधितांना उपचारादरम्यान मोलनुपिरावीर देत असल्यामुळे रुग्ण दगावण्याचे प्रमाण कमी झाले आहे. या औषधामुळे आयसीयूमध्ये रुग्ण भरती करण्याचे प्रमाण कमी झाले आहे. परंतु या औषधामुळे संततीवर परिणाम होत आहे. अनुवंशिक भिन्नता संबंधित समस्या उद्भवू शकतात असे मत आयसीएमआर प्रमुख डॉ. बलराम भार्गव यांनी व्यक्त केलं आहे.


हेही वाचा – Mumbai Crime : शायनिंग मारण्यासाठी पिस्तूल आणणार्‍या तिघांना अटक

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -