घरताज्या घडामोडीOmicron Variant: ओमिक्रॉनला हलक्यात घेऊ नका! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमध्ये दिसली धोकादायक लक्षणे

Omicron Variant: ओमिक्रॉनला हलक्यात घेऊ नका! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमध्ये दिसली धोकादायक लक्षणे

Subscribe

देशात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे तज्ज्ञांनी तिसरी लाट आल्याचे घोषित केले आहे. यामध्ये ओमिक्रॉन व्हेरिएंट (Omicron Variant) आणि डेल्टा व्हेरिएंटचे (Delta Variant) रुग्ण अधिक आढळत आहेत. गेल्या २४ तासांत देशात १.६८ लाख नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. तर आतापर्यंत ओमिक्रॉनचे ४ हजार ४६१ रुग्ण आढळले आहेत. ओमिक्रॉन व्हेरिएंट हा डेल्टापेक्षा घातक नसला तरी अधिक वेगाने पसरणारा आहे. पण ओमिक्रॉनबाधित रुग्ण रिकव्हर झाल्यानंतर त्यांना काही समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यांच्यामध्ये दीर्घकाळीन कोरोना लक्षणे दिसत आहेत.

नव्या अहवालात काय आहे?

युनायटेड किंगडमच्या (United Kingdom) अहवालानुसार, कोरोनाचे दुर्मिळ लक्षण ‘ब्रेन फॉग’ (Brain fog) ओमिक्रॉन व्हेरिएंटमध्ये दिसले आहे. द डेली एक्सप्रेसनुसार, ZOE COVID स्टडी अॅपमध्ये लक्षणांबाबत सांगितले आहे. काही लोकांमध्ये ब्रेन फॉन लक्षणे दिसली आहेत. हा अॅप रुग्णांकडून सांगितल्या गेलेल्या लक्षणांचे विश्लेषण करत असतो.

- Advertisement -

ब्रेन फॉग हा गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे सामान्य लक्षण आहे. माहितीनुसार, ऑक्टोबर २०२०मध्ये ब्रेन फॉनच्याबाबत बातम्या आल्या होत्या. तेव्हा कोरोनाची पहिली लाट सुरू होती. ब्रेन फॉग कोरोनाचे सामान्य लक्षण जसे की ताप, थंडी वाजणे, श्वास घेण्यास त्रास होणे, खोकला इत्यादीप्रमाणे आहे.

अलबामान महाविद्यालय बर्मिंघमच्या न्यूरोलॉजिस्ट डॉ. श्रृती अग्निहोत्री म्हणाल्या की, ब्रेन फॉगमध्ये जास्त करून डोकेदुखी आणि स्मरणशक्ती कमजोर होण्यासारख्या समस्या असू शकतात. काही वेळेला कोरोना रुग्ण ताप आणि श्वास घेण्यास त्रास होण्यासारख्या समस्येतून रिकव्हर होतात. पण डोकेदुखी आणि स्मरणशक्ती कमजोर होण्यासारख्या समस्या अधिक काळासाठी राहतात. काही रुग्ण असेही असतात ज्यांचे म्हणणे असते की, ते कोणत्याही कामावर लक्ष देऊ शकत नाही किंवा लक्ष देण्यास कठीण होते. हे ब्रेन फॉगचे कारण असते. अशी लक्षणे ओमिक्रॉन व्हेरिएंटमध्ये दिसून येत आहेत. आता या व्हेरिएंटमध्ये ब्रेन फॉग कशाप्रकारे लोकांना प्रभावित करेल हे पाहणे महत्त्वाचे आहे

- Advertisement -

हेही वाचा – Omicron Variant: कोरोनातून लवकर बरे व्हायचेय, तर ‘या ‘५ गोष्टींचे सेवन करा


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -