घरदेश-विदेशLive Update: दिल्लीत वीकेंड कर्फ्यू सुरू

Live Update: दिल्लीत वीकेंड कर्फ्यू सुरू

Subscribe

दिल्लीत वीकेंड कर्फ्यू सुरू…वाचा सविस्तर 


गेल्या २४ तासांत राज्यात ४० हजार ९२५ नव्या कोरोनाबाधितांची वाढ होऊन २० जणांच्या मृत्यू नोंद झाली आहे. तर १४ हजार २५६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. तर दुसऱ्याबाजूला राज्यातील आज दिवसभरात एकही ओमिक्रॉनबाधित आढळला नाही.

- Advertisement -


बूस्टर डोस घेण्यासाठी नोंदणीची गरज नाही. थेट केंद्रावर जाऊन बूस्टर डोस गेऊ शकता.

- Advertisement -


राज्यातील कोरोना संदर्भात मुख्य सचिवांनी बैठक बोलावली आहे. गेल्या दोन तासांपासून मुख्य सचिव आणि जिल्हाधिकाऱ्यांची व्हीसीद्वारे बैठक सुरू आहे. त्यामुळे राज्यात आज निर्बंध लागण्याची शक्यता आहे.


गेल्या २४ तासांत मुंबईत २० हजार ९७१ नव्या रुग्णांची नोंद, ६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ८ हजार ४९० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.


गेल्या २४ तासांत धारावीत १५० नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. सध्या धारावीत ५५८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.


राज्यातील कोरोना संदर्भात मुख्य सचिवांनी बैठक बोलावली आहे. मुख्य सचिव आणि जिल्हाधिकाऱ्यांची व्हीसीद्वारे बैठक सुरू झाली आहे. या बैठकीतला अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सादर केला जाणार आहे.


नागपुरात दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदकडून रेकी करण्यात आली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परिसराची जैशकडून रेकी करण्यात आली. जुलै महिन्यात एका तरुणाने नागपुरात दोन दिवस वास्तव्य करून रेकी केली. रेकी करणाऱ्या या तरुणाला जम्मू काश्मीरमध्ये अटक करण्यात आली आहे. पाकिस्तानमधील काहींच्या सांगण्यावरुन नागपुरात रेकी केल्याची माहिती दहशतवाद्याने दिली. याबाबत सेंट्रल एजन्सीकडून नागपूर पोलिसांना माहिती देण्यात आली.


आसाममधील नाईट कर्फ्यूचा वेळ बदलण्यात आला आहे. ८ जानेवारीपासून आसामामध्ये नाईट कर्फ्यू लागू होणार आहे.


रश्मी ठाकरेंविरोधात आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट केल्याप्रकरणी भाजपाचे माजी नगरसेवक संदीप म्हात्रेंना पोलिसांकडून अटक


मोदींच्या सुरक्षेत हलगर्जीपणा झाल्या प्रकरणी भाजपा कार्यकर्त्यांचे गांधी पुतळ्याजवळ निदर्शने


नितेश राणेंचा अटक पूर्व जामीनावर आता बुधवारी होणार सुनावणी, राज्य सरकारने सादर केलेले प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी नितेश राणेंच्या वकीलांना मागितला वेळ


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा अडवणे चुकीचे- सुप्रीम कोर्ट


वैद्यकीय कोट्यातून ओबीसी आरक्षणाला सुप्रीम कोर्टाची मंजुरी,मेडिकलच्या ऑल इंडिया कोटामध्ये 27 टक्के ओबीसी आरक्षण आणि 10 टक्के आर्थिक आरक्षणाला सुप्रीम कोर्टाची परवानगी, आर्थिक आरक्षणासाठी सध्याची क्रिमी लेयर मर्यादा तूर्तास फक्त या वर्षासाठीच, EWS क्रीमीलेयर बाबत अंतिम निर्णय मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात करणार सुप्रीम कोर्ट


आज 7 वाजेपर्यंत मुंबईतील निर्बंध समोर येतील – महापौर किशोरी पेडणेकर


देशात 24 तासात 1 लाख 17 हजार नवे कोरोना रुग्ण, 302 रुग्णांचा मृत्यू



रश्मी ठाकरेंविरोधात आक्षेपार्ह ट्वीट करणाऱ्या जितेन गजारीयाविरोधात पुणे सायबर पोलिसांत गुन्हा दाखल


सुप्रीम कोर्टात दोन न्यायाधिशांना कोरोनाची लागण


कोल्हापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी आज मतमोजणी


पंजाबमध्ये पंतप्रधानांच्या सुरक्षा त्रुटी प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी


पंजाबमध्ये पंतप्रधानांच्या सुरक्षा त्रुटी प्रकरणी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी घेणार पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत चन्नी यांची भेट

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -