Friday, June 9, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Omicron Variant: ओमिक्रॉनच्या भीतीमुळे चीनमध्ये 'क्रूर लॉकडाऊन'; गर्भवती महिला, मुलांना मेटल बॉक्समध्ये...

Omicron Variant: ओमिक्रॉनच्या भीतीमुळे चीनमध्ये ‘क्रूर लॉकडाऊन’; गर्भवती महिला, मुलांना मेटल बॉक्समध्ये जबरदस्तीने करतायत कैद

Subscribe

कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनची (Omicron Variant) दहशत संपूर्ण जगभरात पसरली आहे. ओमिक्रॉनचा शिरकाव झाल्यापासून जगभरात पुन्हा एकदा भीतीदायक परिस्थिती निर्माण झाली आहे. ओमिक्रॉनच्या हाहाकारामुळे चीनच्या काही शहरांमध्ये क्रूर लॉकडाऊन (China Lockdown) लागू केला आहे. चीनच्या अनयांगसह काही शहरांमध्ये हा लॉकडाऊन लागू केला असून दोन कोटींहून अधिक लोकं या कडक लॉकडाऊनमध्ये कैद झाले आहेत. सध्या चीनच्या ‘झिरो कोविड पॉलिसी’ अंतर्गत खूप कठोर निर्बंध लादले जात आहेत.

डेली मेलच्या वृत्तानुसार, चीनने मोठ्याप्रमाणात क्वारंटाईन कँपचे नेटवर्क बनवले आहे. जिथे हजारोच्या संख्येत मेटल बॉक्स बनवले आहेत. यामध्ये गर्भवती महिला, मुलांसह लोकांना आयसोलेट केले जात आहे.

जगातील सर्वाधिक कठोर लॉकडाऊन चीनमध्ये

- Advertisement -

कोरोनाच्या महामारीच्या सुरुवातीला वुहान आणि हुबेई प्रांताच्या काही भागांमध्ये असे कठोर निर्बंध लागू केल्यानंतर आतापर्यंतचा हा चीनमधला सर्वात कठोर लॉकडाऊन आहे. आता Shiyanमध्ये जवळपास सव्वा कोटी लोकं आणि Yuzhouमध्ये १० लाखांहून अधिक लोकं या कडक लॉकडाऊनमध्ये कैद झाले आहेत. तर अनयांग शहरात ५५ लाख लोकं घरामध्ये बंद आहेत. ‘झिरो कोविड पॉलिसी’ अंतर्गत चीनमध्ये ज्याप्रकारे हा कडक लॉकडाऊन लावण्यात आला आहे, हा जगातील सर्वाधिक कठोर लॉकडाऊन असल्याचे म्हटले जात आहे. यामध्ये खूप क्रूर निर्बंध लोकांवर थोपविण्यात आले आहे.

- Advertisement -

 

माहितीनुसार, कोरोनाच्या भीतीमुळे लोकांना मेटलच्या छोट्या बॉक्स असलेल्या खोलीत २ आठवडे ठेवले जात आहे. त्यामध्ये बेड आणि टॉयलेटची सुविधा देण्यात आली आहे. खुद्द चीनी माध्यमांनी याचे फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये Shijiazhuang प्रांतातील १०८ एकरमध्ये बनवलेल्या क्वारंटाईन कॅम्पसमध्ये हजारो लोकांना कशाप्रकारे ठेवण्यात आले आहे, हे दाखवले आहे. हे कॅम्पस जानेवारी २०२१मध्ये पहिल्यांदा केले गेले होते.

जबरदस्तीने क्वारंटाईन सेंटरमध्ये लोकांना केले जातेय कैद

या क्वारंटाईन कॅम्पसमधून बाहेर पडल्यानंतर अनेक लोकांनी आपले वाईट अनभुव शेअर केले आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, थंड मेटल बॉक्समध्ये त्यांना खूप कमी जेवण मिळत होते. त्यांना आपले घर सोडून क्वारंटाईन सेंटरमध्ये राहण्यासाठी जबरदस्ती केली गेली होती. बस भरून येथे लोकांना आणले जायचे.

क्वारंटाईन सेंटरमधून बाहेर पडल्यावर केलीय जातेय मारहाण

बीबीसी वृत्तसंस्थेशी बोलताना एका व्यक्तीने सांगितले की, येथे काही नाही आहे. कोणीही आमचा चाचणी करण्यासाठी येत नाही. हे कोणत्या प्रकारचे क्वारंटाईन सेंटर आहे? वृद्ध आणि मुलांना देखील येथे ठेवले आहे. येथून बाहेर पडल्यावर मारहाण केली जाते.

दरम्यान ओमिक्रॉनच्या धोक्यामुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमध्ये अनयांगच्या लोकांना घरातून बाहेर पडण्यास बंदी आहे. अत्यावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर दुकाने बंद करण्याचा आदेश दिला गेला आहे. अजूनपर्यंत हा क्रूर लॉकडाऊन कधीपर्यंत असणार आहे, हे स्पष्ट झाले नाही.


हेही वाचा – Corona In India: महाराष्ट्रासह चार राज्यांनी देशाची वाढवली चिंता; या राज्यांमध्ये सर्वाधिक पॉझिटिव्हिटी रेट


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -