घरताज्या घडामोडीOmicron Variant : ओमिक्रॉनमुळे ब्रिटेनमध्ये ७५ हजारांपेक्षा जास्त मृत्यू होण्याची शक्यता, लहान...

Omicron Variant : ओमिक्रॉनमुळे ब्रिटेनमध्ये ७५ हजारांपेक्षा जास्त मृत्यू होण्याची शक्यता, लहान मुलांना सर्वाधिक धोका

Subscribe

संपूर्ण जगभरात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने धुमाकूळ घातला आहे. जगभरातील वैज्ञानिकांकडून कोविड-१९ चा नवा व्हेरियंट धोकादायक असल्याचं सांगितलं जात आहे. नव्या व्हेरियंटवर यूकेच्या वैज्ञानिकांनी अभ्यास केला असून त्यासंदर्भात एक निष्कर्ष काढला आहे. जर सुरक्षेत वाढ करण्यात नाही आली तर यूकेमध्ये कोरोना कोविडृ-१९ च्या ओमिक्रॉन व्हेरियंटमुळे २५ ते ७५ हजार नागरिकांचा मृत्यू होऊ शकतो. यूकेमध्ये दिवसागणिक ६०० पेक्षा अधिक रूग्णांची संख्या आढळून येत आहे. असं यूकेच्या वैज्ञानिकांनी केलेल्या अभ्यासातून समोर आलंय.

वैज्ञानिकांच्या अभ्यासानुसार, रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे आणि बूस्टरचे उच्च डोस प्रभावी आहेत, तर रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता ६० टक्क्यांपर्यंत असते. इंग्लंडमध्ये ओमिक्रॉन B.1.1.1.529 व्हेरियंटमुळे SARS-COV2 वेगाने पसरत आहे. अल्फाच्या तुलनेत यांसंदर्भातील केस भरपूर प्रमाणात वाढत आहेत. यूरोपमधील यूके आणि डेनमार्कमध्ये ओमिक्रॉन व्हेरियंटचे रूग्ण वाढत आहेत. येथील डेल्टाची लक्षणं कमी प्रमाणात आढळत आहेत. परंतु ओमिक्रॉनमुळे रूग्णालयात दाखल होणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. भारतात आतापर्यंत ओमिक्रॉनचे ३८ नवीन रूग्णांची नोंद करण्यात आली आहे.

- Advertisement -

लहान मुलांना ओमिक्रॉनचा सर्वाधिक धोका

ब्रिटिश वैज्ञानिकांच्या मते, हा व्हेरियंट लहान मुलांसाठी अधिक धोकादायक असल्याचं सांगितलं जात आहे. दक्षिण आफ्रिका आणि यूकेच्या डेटानुसार हा व्हेरियंट लहान मुलांसाठी एक धोक्याची घंटा आहे. ज्या प्रमाणे मुलं येथे येत आहेत. त्याप्रमाणे त्यांच्यामध्ये गंभीर लक्षणं आढळलेली दिसत आहेत. कारण ऑक्सिजन, सपोर्टिव थेरपी यांसारख्या गोष्टींची रूग्णालयात गरज भासत आहे.

दक्षिण आफ्रिकेत डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, ओमिक्रॉनची लक्षणं विविध प्रकारची असू शकतात. तरूणांमध्ये थकवा, डोकेदुखी , खांदेदुखी, ताप आणि सर्दी अशी लक्षणं आढळून येत आहेत. WHO ने दिलेल्या माहितीनुसार, ओमिक्रॉन एकूण ६३ देशांत पसरला आहे. दक्षिण आफ्रिकेत कोविड-१९ चा नवा व्हेरियंट वेगाने पसरत आहे. तर ब्रिटेनमध्ये डेल्टा जास्त धोकादायक व्हेरियंट आहे. कम्यूनिटी ट्रान्समिशनमुळे नवीन व्हेरियंट डेल्टापेक्षाही वेगाने पसरू शकतो.

- Advertisement -

हेही वाचा: रॅली होऊ न देण्यासाठी राजकीय आणि पोलिसांकडून दबाव – खासदार इम्तियाज जलील


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -