Live Update : राज्यात आज ३ हजार ९०० नव्या कोरोना रुग्णांची नोंद

Live update Maharashtra Politics Maharashtra politics CM Eknath Shinde Deputy CM Devendra Fadnavis Uddhav Thackeray Khed Sabha Shiv Sena Thackeray group BJP Congress NCP MNS Sports IND VS AUS Cricket Kusti

राज्यात आज ३ हजार ९०० नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर १ हजार ३०६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आज २० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.


मुंबईत आज २ हजार ५१० नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर आज एका रुग्णाचा मुंबईत मृत्यू झाला आहे. मुंबईत सध्या ८ हजार ६० अँक्टिव्ह रुग्ण आहेत.


सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे मतदार प्रमोद वायंगणकर गायब. शिवसेनेचे नेते संजय पारकर पोलीस ठाण्यात दाखत


आमदार नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर उद्या गुरुवारी निर्णय होणार असून आजचा दोन्ही बाजूच्या युक्तिवाद संपला आहे.


सरकारी वकील आणि अॅड संग्राम देसाई यांच्यात खडाजंगी, सरकारी वकील जाणूनबुजून वेळ काढत असल्याचा नितेश राणे यांचा आरोप तर नितेश राणे सहकार्य करत असल्याचे सरकारी वकिलांचे म्हणणे आहे.


दहिसर (पू) येथील एसबीआय बँकेत काही वेळापूर्वी गोळीबाराची घटना घडली होती. हल्लेखोरांनी एका व्यक्तीच्या छातीत गोळी झाडली आणि 2.50 लाख रुपये घेऊन पळ काढला. जखमी व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून दरोडेखोरांना पकडण्यासाठी दहिसरमध्ये नाकाबंदी करण्यात आली आहे.


केंद्रीय मंत्र्यांनी गुन्हेगारांना पाठीशी घालू नये- संजय राऊत


गुन्हेगारांना पकडण्यासाठी वेळ नाही पण राणेंच्या घरावर नोटीस चिटकवण्य़ासाठी वेळ आहे- संजय राऊत


नारायण राणेंच्या घरावर कणकवली पोलिसांनी नोटीस चटकवली


सरकारने राणे केंद्रीय मंत्री असल्याचे भान ठेवावे, सिंधुदुर्ग जिल्हा राणेंच्या हाती जाईल म्हणून दबावाचे काम – प्रवीण दरेकर


केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलीस ठाण्यात हजर राहण्याची नोटीस, कणकवली पोलीस ठाण्यात ३ वाजता हजर राहण्याचे आदेश


खासदार सुप्रिया सुळे आणि त्यांचे पती कोरोना पॉझिटिव्ह


अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी जनतेने सरकारचा खरा चेहरा पाहिला- सुधीर मुनगंटीवार


अभिनेता अर्जुन कपूर आणि त्याची बहिण कोरोना पॉझिटिव्ह


आमदार नितेश राणेंच्या अटकपूर्ण जामीन अर्जावर सुनावणी सुरु


अनिल देशमुखांविरोधात मनी लॉन्ड्रिंगप्रकरणात ईडीकडून पुरवणी कोर्टात आरोपपत्र दाखल, अनिल देशमुखांविरोधात आज दुसरं आरोपपत्र दाखल, चांदीवाल आयोगाने वकिलांना भेटण्याची दिली परवानगी


मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत आज कोरोनाच्या वाढत्या संसर्गासंदर्भात आणि  बाधीत रुग्णंसंख्येवरील उपाययोजनां संदर्भात महत्वाची बैठक, मुंबई महापालिका मुख्यालयात दुपारी १ वाजता होणार आहे.


काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले दिल्लीत, वरिष्ठ नेत्यांची घेणार भेट


मुख्यमंत्र्यांनी पाठवलेल्या पत्रावर राज्यपालांची नाराजी, पत्रातील भाषेवर राज्यपालांचा आक्षेप


आमदार सुधीर मुनगंटीवार यांची दुपारी १ वाजता पत्रकार परिषद,  नरिमन पॉईंट येथील भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यालय होणार पत्रकार परिषद


मुख्यमंत्र्यांची प्रकृती तंदुरुस्त आहे- संजय राऊत


कोल्हापूरात ३८ एसटी कर्मचाऱ्यांना निलंबनाची नोटीस



आमदार नितेश राणेंच्या अटकपूर्ण जामीन अर्जावर आज पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे. संतोष परब हल्ल्या प्रकरणात त्यांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात होती.