Live Update: मुंबईत गेल्या २४ तासात ३,६७१ नव्या रुग्णांची नोंद

live update

एकूण २८२ नमुन्यांमध्ये ‘डेल्टा व्हेरिअंट’ चे १३ टक्के, ‘डेल्टा डेरिव्हेटीव्ह’ चे ३२ टक्के तर ‘ओमायक्रॉन’चे ५५ टक्के रुग्ण

• २८२ पैकी फक्त १७ जणांनाच रुग्णालयात करावे लागले दाखल

• ओमायक्रॉन बाधित १५६ पैकी केवळ ९ जणांना रुग्णालयीन उपचारांची भासली गरज

• नमुने संकलित केलेल्यांपैकी डेल्टा डेरिव्हेटीव्ह बाधित एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू


मुंबईत गेल्या २४ तासात ३,६७१ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर तर ३७१ रुग्णांची कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आज शून्य रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.


यशोमती ठाकूर यांना कोरोनाची लागण


नवी मुंबईत थर्टी फर्स्टच्या पार्टीसाटी आलेले अडीच कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत. यात केमिकल इंजिनीअरसह तिघांना अटक करण्यात आली आहे.


यापुढील प्रत्येक निवडणूक भाजप जिंकणार – नारायण राणे


सगळ्यांना पुरून उरलो आणि केंद्रापर्यंत पोहोचलो, कधी थांबलो नाही – नारायण राणे


यांची लायकी पोस्टरबाजी करण्याची, राज्य करण्याची नाही – नारायण राणे


३६ मतं मिळत नाही आणि विधानसभेची गोष्ट करतात – नारायण राणे


आता लक्ष महाराष्ट्रात सत्ता आणण्याकडे – नारायण राणे


विजय मिळवताना अकलेचा वापर झाला – नारायण राणे


सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर माझी नव्हे भाजपची सत्ता – नारायण राणे


केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या घराबाहेर समर्थकांचा जल्लोष


केंद्रीय मंत्री नारायण राणे सिंधुदुर्गात दाखल, थोड्याच वेळात घेणार पत्रकार परिषद


मुंबईत १५ जानेवारीपर्यंत नवे निर्बंध लागू. मुंबईत संध्याकाळी ५ ते सकाळी ५ वाजेपर्यंत चौपाटी, बागा, सार्वजनिक ठिकाणी जाण्यास बंदी.


बिहारमध्ये पहिला ओमिक्रॉनबाधित आढळला आहे.


मजूर संस्था मतदारसंघांमध्ये भाजप प्रणित उमेदवार गजानन गावडे यांना ११०, तर महा विकास आघाडीचे लक्ष्मण आंगणे यांना ८५ मते मिळाली.


पणन संस्था मतदारसंघातून भाजपचे अतुल काळसेकर यांना ४४ तर महा विकास आघाडीचे सुरेश दळवी यांना २६ मते मिळाली.


कणकवलीतून विठ्ठल देसाई विजयी, समसमान मतं मिळाल्याने चिठ्ठी टाकून निकाल


सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत पराभूत झाले आहेत. यामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. सविस्तर वृत्त वाचा 


सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजप विरोध शिवसेना चुरशीचा सामना सुरू आहे. वैभववाडीत भाजपचे दिलीप रावराणे दोन मतांनी विजयी झाले आहेत. तसेच सावंतवाडीतून शिवसेनेचे विद्याधर परब विजयी झाले आहेत. देवगडमध्ये भाजपचे प्रकाश बोडस विजयी झाले असून वेंगुर्लेमध्ये भाजपच्या मनीष दळवींचा विजय झाला आहे.


केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज अयोध्येतील रॅलीला संबोधित करणार आहेत.


महाराष्ट्रातील सर्व निवासी डॉक्टर आजपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. त्यामुळे रुग्णसेवेला फटका बसण्याची शक्यता आहे. नीट-पीजी काऊन्सिलिंग प्रक्रिया रखडल्याने निवासी डॉक्टर आक्रमक झाले आहेत. नीट-पीजी काऊन्सिलिंग प्रक्रियेची जोपर्यंत तारीख जाहीर होत नाही, तोपर्यंत संप सुरूच ठेवण्याचा इशारा सेंट्रल मार्डने दिला आहे.


मध्य रेल्वेच्या ठाणे ते दिवा मार्गावर रविवारी २४ तासांचा मेगाब्लॉक असणार आहे. उद्या रात्री २ ते रविवारी २ वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. ठाणे ते कल्याण मार्गावर धीम्या मार्गावर अप आणि डाऊन दिशेला एकही लोकल धावणार नाही. ठाकुर्ली, कोपर, मुंब्रा आणि कळवा स्थानकांवर एकही लोकल उपलब्ध नसेल. दरम्यान या २४ तासांच्या मेगाब्लॉकमुळे २०० लोकलच्या फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत.


मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचे सावट आहे. केंद्रीय गुप्तचर यंत्रणेकडून हायअलर्ट जारी करण्यात आला असून मुंबईतल्या प्रमुख स्टेशनवरची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. त्यामुळे सुरक्षेचा कारणास्तव मुंबई पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत.