घरताज्या घडामोडीOmicron Variant: ओमिक्रॉनचा प्रसार भारतातही..., ICMRचे तज्ज्ञ डॉ. पांडांचं मोठं विधान

Omicron Variant: ओमिक्रॉनचा प्रसार भारतातही…, ICMRचे तज्ज्ञ डॉ. पांडांचं मोठं विधान

Subscribe

कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनमुळे जगभरात भीतीचे वातावरण पसरले आहे. यादरम्यान ओमिक्रॉनबाबत इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे (ICMR) तज्ज्ञ डॉ. समीरण पांडा यांनी मोठं विधान केलं आहे. भारतात ओमिक्रॉन व्हेरिएंटचा प्रसार झाला असून त्याचा शोध लागण्यासाठी वेळ लागू शकतो. त्यामुळे देशात ओमिक्रॉन आढळून आला तरी आश्चर्य वाटण्याचं काही कारण नाही असं विधान समीरण पांडा यांनी केलं आहे.

डॉ. समीरण पांडा म्हणाले की, ९ नोव्हेंबरला दक्षिण आफ्रिकेत पहिल्या ओमिक्रॉन रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर २६ नोव्हेंबरला जागतिक आरोग्य संघटनेने या व्हेरिएंटचे नामकरण करून ‘व्हेरियंट ऑफ कंसर्न’मध्ये त्याची नोंद केली. यादरम्यान दक्षिण आफ्रिकेसह इतर देशातील लोकं जगभरात फिरले आहेत. त्यांच्यापैकी काही जणांना ओमिक्रॉनची बाधा झाल्याची शक्यता आहे. भारतात देखील दक्षिण आफ्रिकेतून आलेले बरेच प्रवासी आहेत. हा व्हेरियंट वेगाने पसरणारा असल्यामुळे भारतात आलेल्या प्रवाशांमध्ये ओमिक्रॉन आढळू शकतो. त्यामुळे जरी ओमिक्रॉन आढळून आला तरी आश्चर्य वाटण्याचं कारण नाही.

- Advertisement -

दरम्यान ओमिक्रॉनवर लस परिणामकारक आहे की नाही? याबाबत डॉ. पांडा म्हणाले की, ओमिक्रॉनविरोधात फक्त लसचं मदत करू शकते असं नाही. हे समजून घेण्याची गरज आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लस गंभीर रोग टाळण्यास मदत करू शकते. तसेच लसीमुळे रुग्णालयात दाखल होण्याचं प्रमाण कमी होत. तसंच मृत्यू देखील रोखला जाऊ शकतो. पण लस घेऊन संसर्ग टाळता येऊ शकत नाही. ओमिक्रॉन पूर्वी आलेल्या डेल्टा व्हेरिएंटने भारतात धुमाकूळ घातला आणि यामुळे कोरोनाची दुसरी लाट गंभीर झाली होती. त्यामुळे पुन्हा एकदा मोठ्या संख्येने रुग्ण आढळून आरोग्य पायाभूत सुविधेवर परिणाम होऊ शकतो. तसेच संसर्ग आणि मृत्यूच्या प्रमाणतही वाढ होऊ शकते.


हेही वाचा – Omicron Variant: अमेरिकेत ओमिक्रॉन व्हेरिएंटची एंट्री; दक्षिण आफ्रिकेतून परतलेल्या व्यक्तीला ओमिक्रॉनची लागण

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -