घरदेश-विदेशLive Update : राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवी नियमावली जारी, रात्री ११ ते...

Live Update : राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवी नियमावली जारी, रात्री ११ ते सकाळी ५ वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू

Subscribe

राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवी नियमावली जारी

रात्री ११ ते सकाळी ५ वाजेपर्यंत संचार बंदी /नाईट कर्फ्यू
मैदान, उद्यान, पर्यटन स्थळ बंद
स्विमींग पूल, स्पा, जीम पूर्ण बंद
शाळा कॉलेज १५ तारखेपर्यंत बंद
हॉटेल रेस्टॉरंटमध्ये ५० टक्के आसनव्यवस्था बंधनकारक
सार्वजनिक वाहतूकीसाठी दोन्ही डोस घेतलेल्यांना परवानगी
थिएटर ५० टक्के क्षमतेने सुरु राहणार (सविस्तर वाचण्यासाठी इथे क्लिक करा)

- Advertisement -

मुंबईत २० हजार ३१८ नवे रुग्ण

५ कोरोनाबाधितांचा मृत्यू

- Advertisement -

मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी २० हजार पेक्षा अधिक कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे.


भाजप आमदार आशिष शेलार यांच्यासह कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला गुन्हे शाखेने अटक केली आहे.

पूर्ववैमनस्यातून धमकी दिली असल्याची माहिती मिळत आहे. (सविस्तर वाचण्यासाठी इथे क्लिक करा )


भाजपच्या सोयीनुसार टप्प्यांचे आयोजन करण्यात आले असल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

गोव्यामध्ये महाविकास आघाडीसारखा प्रयोग करण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे संजय राऊत म्हणाले आहेत.

गोवा आणि उत्तर प्रदेशमध्ये शिवसेना निवडणूक लढवणार – राऊत

उत्तर प्रदेशमध्ये ७ टप्पे आणि पंजाबमध्ये १ टप्पा हे सोईचं राजकारण – संजय राऊत


उत्तर प्रदेश, मणिपूर, उत्तराखंड, पंजाब, गोवा राज्यांत निवडणुका, 690 जागांसाठी होणार निवडणुका, पाच राज्यांत 18.34 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत, रोड-शो, प्रचार सभा, सायकल रॅलींना बंदी, पाच राज्यातील निवडणुका 7 टप्प्यात होणार, उत्तर प्रदेश निवडणुकीचा पहिला टप्पा 10 फेब्रुवारीला तर दुसरा टप्पा 14 फेब्रुवारीला, 10 मार्चला पाचही राज्यातल्या निवडणुकांचा निकाल जाहीर होणार, पंजाब, उत्तराखंड, गोव्या राज्यात एका टप्प्यात निवडणुका, मणिपूरमध्ये दोन टप्प्यात मतदान, तर उत्तर प्रदेशात सात टप्प्यात मतदान होणार आहे- निवडणूक आयोग


पाच राज्यांच्या निवडणुकींच्या तारखा आज होणार जाहीर, केंद्रीय निवडणूक आयोग ३.३० वाजता घेणार पत्रकार परिषद


नागरिकांनी घाबण्यापेक्षा काळजी घेतली पाहिजे, 20 हजार पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 18 हजार रुग्णांना लक्षणं नाही-  महापौर किरोशी पेडणेकर


भाजप आमदार गिरीश महाजन यांना कोरोनाची लागण


भुजबळांचे 23 कर्मचारी कोरोनाबाधित, छगन भुजबळांचा रिपोर्ट मात्र निगेटिव्ह


भाजपा नेते आशिष शेलार यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी, पोलीस आयुक्तांना पत्राद्वारे केली तक्रार


देशात आज कोरोनाचे 1 लाख 41 हजार 986 नवे रुग्ण, तर 285 रुग्णांचा मृत्यू


राज्यात वैद्यकीय वापरासाठी दिवसाला ४२४ मेट्रीक टन ऑक्सिजनची गरज, मात्र ही मागणी पूर्ण करण्यासाठी राज्याकडे मुबलक साठा असून ऑक्सिजनची कमतरता, टंचाई भासणार नाही, पहिल्या लाटेसारखी परिस्थिती निर्माण होणार नाही असा दावा अन्न आणि औषध प्रशासनाने केला आहे.


हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यात बहुतांश ठिकाणी आज पहाटेपासूनच हलक्या पावसाने हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. मुंबईतील बोरिवली, कांदिवली, अंधेरी, विलेपार्ले, सांताक्रुझ अशा भागांत रिमझिम पाऊस पाहायला मिळाला. यातच पुढील चार ते पाच दिवस राज्यात अवकाळी पावसासोबतच गारपिट होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -