Omicron Variant : जगभरातील ४७ देशात ओमिक्रॉन व्हेरियंटचा धुमाकूळ, दक्षिण आफ्रिकेत रूग्णांचा आकडा ७०० पार

दक्षिण आफ्रिकेत कोरोनाच्या नव्या व्हेरियंट धूमाकूळ घातला आहे. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात कोविड-१९ च्या नव्या व्हेरियंटने दक्षिण आफ्रिकेला हदरून सोडलं आहे. डब्ल्यूएचओनुसार, ४७ पेक्षा जास्त देशांमध्ये ओमिक्रॉन व्हेरियंटचा प्रभाव मोठ्या संख्येने वाढत आहे. परंतु अद्यापही या व्हेरियंटमुळे सुदैवाने कोणाचाही मृत्यू झालेला नाहीये. परंतु ओमिक्रॉनचं संक्रमण दक्षिण आफिकेसह अमेरिका आणि इतर युरोपीय देशांमध्ये वाढत आहे. हॉस्पीटलमध्ये रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. अमेरिका आणि युरोप यांसारख्या देशांमध्ये ओमिक्रॉनच्या प्रसाराला सुरूवात झाली आहे. येथील तज्ञांनी सांगितले की, कोविड-१९ चा नवा व्हेरियंट संपूर्ण जगभरात थैमान घालू शकतं.

दक्षिण आफ्रिकेतील डॉक्टर आणि विशेषज्ञांनी सुरूवातीला रूझानोच्या आधारावर आश्वासत करत संक्रमण धोका खूप कमी होता. दक्षिण आफ्रिकेत एकूण हे संक्रमण ७०० टक्क्यांच्या वर गेले आहे. मागील सोमवारी २३०० जणांना ओमिक्रॉनची लागण झाली होती. त्यामुळे शुक्रवारपर्यंत हे संक्रमण १६ हजारांच्या वर गेले होते. परंतु ७० टक्के अधिक लागण ही ओमिक्रॉन व्हेरियंटची होत असल्याचं निर्दशनास आलं आहे.

या देशात आढळले कोरोनाचे नवीन रूग्ण

दक्षिण आफ्रिका, सेनेगल, बोत्सवाना, मेक्सिको, भारत, नेदरलँड, हॉंगकाँग, ईस्त्राइल, बेल्जियम, ब्रिटेन, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, इटली, चेक गणराज्य, डेनमार्क, ऑस्ट्रिया आणि इतर युरोपीय देशांमध्ये कोविड-१९ चा नवीन व्हेरियंट आढळून आला आहे. थायलंडचे रोग नियंत्रण विभागातील महानिदेशक ओपस कार्नकाविनपोंग यांनी सांगितलं की, थायलंडमध्ये ओमिक्रॉनचा पहिला रूग्ण आढळून आला होता. यामध्ये अमेरिकेचा नागरिक आढळून आला होता. २९ नोव्हेंबर रोजी हा प्रवासी स्पेनमधून थायलंडला आला होता. त्याचप्रमाणे थायलंड ४७ वा देश आहे. ज्यामध्ये ओमिक्रॉनचा व्हेरियंट मोठ्या प्रमाणात आढळून येताना दिसत आहे.

थायलंडमधील ५७ टक्के लोकांनी कोरोनाची लस घेतली आहे. तर नेपालच्या आरोग्य मंत्रालयातून सांगण्यात आलंय की, नेपालमध्ये काल सोमवारी दोन नागरिकांमध्ये ओमिक्रॉन व्हेरियंटचे नवीन रूग्ण आढळून आले होते. यामध्ये एक व्यक्ती नेपाळी होता. तर दुसरा व्यक्ती हा विदेशी होता. तसेच जपानमध्ये सुद्धा सोमवारी ओमिक्रॉन व्हेरियंटचा तीसरा रूग्ण आढळला होता.

च्यूईंगमच्या माध्यमातून संक्रमण रोखण्याचा प्रयत्न

अमेरिकेतील वैज्ञानिकांनी च्यूईंग गमवर काम करण्यास सुरूवात केली आहे. कोरोना व्हायरसला थांबवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. त्याच्या उपयोग झाडांमध्ये प्रोटीनसाठी केला जातो. एसीई-२ या नावाचा प्रोटीन लोकांच्या उपस्थितीत व्हायसरची संख्या कमी करण्यासाठी मदत होती. संक्रमीत झालेली व्यक्ती या उपयोगाचा वापर करू व्हायरस रोखण्यास मदत होऊ शकते. असं सांगितलं जात आहे.


हेही वाचा: Omicron चा संसर्ग रोखण्यासाठी भारतात पुन्हा लॉकडाऊन? जाणून घ्या तज्ज्ञांचे