घरताज्या घडामोडीOmicron variant: ओमिक्रॉनपासून संरक्षणासाठी तिसरा डोस पुढील वर्षापासून, या लोकांपासून होणार सुरुवात

Omicron variant: ओमिक्रॉनपासून संरक्षणासाठी तिसरा डोस पुढील वर्षापासून, या लोकांपासून होणार सुरुवात

Subscribe

देशात कोरोना आणि ओमिक्रॉनचा संसर्ग रोखण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. सध्या कोरोना प्रतिबंधक लसीचे लसीकरण वेगाने करण्यावर भर दिला जात आहे. पंरतु ओमिक्रॉनची रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे चिंता वाढली आहे. परदेशात ओमिक्रॉनपासून संरक्षणासाठी तिसरा लसीचा डोस देण्यास सुरुवात केली आहे. परंतु भारतात अद्याप सुरुवात झाली नाही. पुढील वर्षापासून कोरोना लसीच्या तिसऱ्या डोससाठी मान्यता मिळण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी आणि अति जोखमीच्या लोकांना लसीकरण करण्याचा निर्णय़ केंद्र सरकार घेण्याच्या तयारीत आहे.

देशात ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र काही रुग्ण बरे झाले असल्यामुळे ही देशासाठी दिलासादायक बाब आहे. सध्या देशात तिसऱ्या डोसबाबत अनेक अडचणी आहेत त्या दूर केल्यानंतर केंद्र सरकारकडून तिसऱ्या डोसची मान्यता देण्यात येणार आहे. सध्या देशात कोव्हिशील्ड आणि कोवॅक्सिनच्या परीक्षण आणि परिणामांचा अहवाल येणं बाकी आहे.

- Advertisement -

राष्ट्रीय लसीकरण सल्लागार समितीमधील वरिष्ठ डॉक्टरांनी सांगितले की, ओमिक्रॉनपासून संरक्षणासाठी तिसऱ्या डोसची गरज असल्याचे जवळपास सर्वच तज्ज्ञांचे मत आहे. परंतु याची परवानगी आता देण्यात येऊ शकत नाही. कारण तिसऱ्या डोसबाबतची तयारी आपल्याकडे झाली नाही.

भारतात कोव्हिशील्ड़ची चाचणी नाही

देशात अजूनपर्यंत तिसऱ्या डोससाठी कोविशील्डची चाचणी करण्यात आली नाही. याबाबतची चाचणी पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वॉयरोलॉजी येथे सुरु आहे. एनआयव्हीचे तज्ज्ञ वैज्ञानिकांच्या अहवालाची प्रतिक्षा करण्यात येत आहे.

- Advertisement -

पहिल्या टप्प्यात कोणाला मिळणार लस

कोरोनाप्रतिबंधक लसीच्या तिसऱ्या डोसचे लसीकरण करण्यासाठी नियम आणि अटी तयार करण्यात येणार आहेत. तिसऱ्या लसीच्या डोसच्या चाचणीचा अहवाल ३ आठवड्यांनी येईल. यानंतर तिसऱ्या डोसचे लसीकरण करण्यात येईल. पहिल्या टप्प्यात डॉक्टर, आरोग्य कर्मचारी आणि अति जोखीम असलेले अशा ४० कोटी लोकांना पहिल्यांदा तिसऱ्या लसीचा डोस देण्यात येणार आहे.

कोवावॅक्सच्या आपत्कालीन वापरासाठी डल्बूएचओची मंजूरी

जागतिक आरोग्य संघटनेने सीरम इंन्स्टिट्यूटमध्ये तयार करण्यात आलेल्या अमेरिकेच्या नोवावॅक्सच्या कोवावॅक्सिनला आपत्कालीन परिस्थितीमध्ये वापर करण्यास मंजूरी दिली आहे. कोवावॅक्स ही जागतिक आरोग्य संघटनेकडून परवानगी मिळवणारी ९ वी व्हॅक्सिन ठरली आहे.


हेही वाचा : आता लहान मुलांनाही मिळणार लस, Covavaxच्या आपत्कालीन वापरासाठी WHO कडून मंजूरी

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -