घरताज्या घडामोडीOmicron: ओमिक्रॉनच्या वाढत्या धोक्यामुळे ११ देशांचा जोखीम श्रेणीत समावेश, विमानतळावर कोरोना चाचणी...

Omicron: ओमिक्रॉनच्या वाढत्या धोक्यामुळे ११ देशांचा जोखीम श्रेणीत समावेश, विमानतळावर कोरोना चाचणी बंधनकारक

Subscribe

कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरियंटने दक्षिण आफ्रिकेमध्ये हाहाकार घातला आहे. जगभरात ओमिक्रॉन व्हायरस पसरत आहे. भारतात ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना सुरु केल्या आहेत. केंद्र सरकार आणि राज्य सरकार देखील या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेत आहे. ज्या देशात ओमिक्रॉन व्हेरियंटचा शिरकाव झाला आहे तसेच ज्या देशात ओमिक्रॉनचे रुग्ण असल्याची संभावना आहे. अशा ११ देशांना केंद्र सरकारने जोखिम श्रेणीत टाकले असल्याची माहिती केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी लोकसभेत दिली आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये उत्तर देताना नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी माहिती दिली आहे.

केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी लोकसभेत माहिती दिली आहे की, केंद्र सरकार ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेत आहे. तसेच कठोर उपाययोजना देखील केल्या आहेत. यामध्ये जोखिम श्रेणीतील देशांमधून आलेल्या प्रवाशांची विमानतळावर कोरोना चाचणी करण्यात येत असल्याचे सिंधिया यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

ओमिक्रॉनच्या धोक्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची आढावा बैठक

केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सांगितले की, ज्या देशांना ओमिक्रॉनच्या व्हेरियंटमुळे जोखिम श्रेणीमध्ये ठेवले आहे. त्यामध्ये यूनायटेड किंगडम आणि युरोपातील सर्व देश आहेत. दक्षिण आफ्रिका, बोत्सवाना, ब्राझील, चीन, मॉरीशस, न्यूझीलंड, जिम्बाब्वे, सिंगापुर, हाँगकाँग आणि इजरायल या देशांचाही समावेश आहे. या देशांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. अशा परिस्थितीमध्ये केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी सर्व राज्यांच्या सरकारसोबत बैठक घेतली. यामध्ये स्क्रिनिंग आणि कोरोना चाचणी बंधनकारक करण्याचे आदेश दिले आहेत. या बैठकीला विमानतळाचे अधिकारीही उपस्थित होते.

ओमिक्रॉन व्हेरियंटचा अमेरिकतेही शिरकाव

अमेरिकेत बुधवारी कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरियंटचा रुग्ण सापडला आहे. दक्षिण आफ्रिकाहून कॅलिफोर्नियाला गेलेल्या एका व्यक्तिला कोरोनाची लागण झाली आहे. दोन लसीचे डोस घेतल्यानंतरही या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. जगभरातील संशोधक संशोधन करण्यात व्यस्त झाले आहे की, नवीन कोरोना व्हेरियंट पहिल्या कोरोनापेक्षा अधिक धोकादायक आहे का? अमेरिकेतील रुग्ण २२ नोव्हेंबरला दक्षिण आफ्रिकेतून आला होता. संसर्गाचे लक्षण दिसल्यानंतर सोमवारी त्याला अहवाल सकारात्मक आला आहे.

- Advertisement -

हेही वाचा :  Omicron Variant: आफ्रिकेत ओमिक्रॉनचा हाहाकार; लॉकडाऊन केला लागू


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -