घरताज्या घडामोडी'Omicron'च्या महामारीत किरकोळ व्यवसायाची 10 दिवसांत 45 टक्क्यांनी घसरण

‘Omicron’च्या महामारीत किरकोळ व्यवसायाची 10 दिवसांत 45 टक्क्यांनी घसरण

Subscribe

देशात ठिकठिकाणी लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमुळे गेल्या 10 दिवसांत 45 टक्के रिटेल व्यवसाय तोट्यात आहे. 14 जानेवारीपासून लग्नसराईचा हंगाम सुरू होत आहे. त्यामुळे पुढील अडीच महिन्यांत सुमारे 4 लाख कोटी रुपयांचा व्यवसाय होण्याचा अंदाज होता, त्यातही आता 3 लाख कोटी रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

गेल्या दोन वर्षापासून संपूर्ण जग कोरोना महामारीच्या विळख्यात अडकला आहे. त्यातच आता कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉन पुन्हा एकदा डोके वर काढत आहे. त्यामुळे पुन्हा अनेक गोष्टींवर निर्बंध लादण्यात आले.याशिवाय काही ठिकाणी नाइट कर्फ्यू आणि वीकेंड कर्फ्यू लागण्यास सुरुवात झाली आहे. याशिवाय लॉकडाऊनचे संकेत देण्यात आले आहेत. देशात ठिकठिकाणी लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमुळे गेल्या 10 दिवसांत 45 टक्के रिटेल व्यवसाय तोट्यात आला आहे. 14 जानेवारीपासून लग्नसराईचा हंगाम सुरू होत आहे. त्यामुळे पुढील अडीच महिन्यांत सुमारे 4 लाख कोटी रुपयांचा व्यवसाय होण्याचा अंदाज होता, त्यातही आता 3 लाख कोटी रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यात हे या दिवसांमध्ये लग्नसराईला सुरुवात होते,तसेच मकरसंक्रांतीचा सण अवघ्या काही दिवसांत येऊन ठेपला आहे. या दिवसांत किरकोळ व्यापाऱ्यांची मोठी कमाई होत असते. मात्र, निर्बंधांमुळे व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

कंफेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सच्या माहीतीनुसार, वेगवेगळ्या राज्यांमध्ये अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. त्यामुळे याचा परिणाम मोठया प्रमाणात किरकोळ व्यवसायावर होत आहे. गेल्या 10 दिवसांमध्ये किरकोळ व्यवसायात 45 टक्क्यांनी घसरण झाली आहे. देशातील एकूण किरकोळ व्यापार सुमारे 125 लाख कोटी रुपयांचा असताना, CAIT ने केंद्र सरकार आणि सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्याना कोरोना रोखण्यासाठी शक्य ती पावले उचलण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कॅटचे राष्ट्रीय सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांना दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दहा दिवसांत किरकोळ व्यवसाय तोट्यात गेला असून, या व्यवसायांची घसरण 45 टक्क्यांनी झाली आहे.

- Advertisement -

इतक्या टक्क्यांनी किरकोळ व्यवसायात झाली घसरण

CAIT ने दिलेल्या माहितीनुसार, 35 एफएमसीजी टक्के, इलेक्ट्रॉनिक्स मध्ये 45 टक्के, 50 टक्के मोबाईल, दैनंदिन गरजेच्या गोष्टींवर 30 टक्के, खेळणी 65 टक्के, भेट 65 टक्के वस्तू, बिल्डर हार्डवेअरमध्ये 40 टक्के, सौंदर्यप्रसाधनांमध्ये 25 टक्के, फर्निचरमध्ये 40 टक्के,फुटवेअर वरती 60 टक्क्यांनी आणि दागिन्यांवर 30 घट झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.


हेही वाचा – Mumbai : पालिकेच्या मोक्याचा भुखंड बिल्डरला आंदण ; 5०० कोटींच्या भ्रष्टाचाराचा भाजपवर आरोप

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -