घरताज्या घडामोडीOmicron Origin : ओमिक्रॉनची उत्पत्ती उंदरातून ? चीनने जगासमोर मांडले नवे संशोधन

Omicron Origin : ओमिक्रॉनची उत्पत्ती उंदरातून ? चीनने जगासमोर मांडले नवे संशोधन

Subscribe

जगभरात कोरोना व्हायरसची उत्पत्ती ही नेमकी कुठून झाली यानिमित्ताने जागतिक पातळीवर मोठा वाद झाला होता. त्यावेळी वुहानच्या लॅबमधून हा मानवनिर्मिती व्हायरस लीक झाल्याची चर्चा झाली होती. तसेच लॅबच्या जागतिक आरोग्य संघटनेच्या अॅक्सेसपासून ते अमेरिकेचे आरोप असे अनेक दावे आणि प्रतिदावे या प्रकरणात झाले होते. तर दुसरीकडे वटवाघूळातून या व्हायरसची उत्पत्ती झाल्याचीही चर्चा झाली होती. कोरोना व्हायरसनंतर आता ओमिक्रॉन या व्हेरीएंटच्या उत्पत्तीच्या निमित्ताने आता चर्चा रंगू लागली आहे. ओमिक्रॉनच्या व्हेरीएंटच्या उत्पत्तीबाबत आता चीननेच एक अभ्यास मांडला आहे.

कोरोनाचा नवा व्हेरीएंट असलेल्या ओमिक्रॉनने संपूर्ण जगभरात पुन्हा एकदा महामारीचे संकट गडद केले आहे. अनेक कार्यक्रम या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आले आहेत. तसेच अनेक प्रकारच्या बंधनांमुळे पुन्हा एकदा कोरोनाचे सावट सार्वजनिक जीवनात भेडसावत आहे. जगभरातील संशोधक हे ओमिक्रॉनच्या उत्पत्तीचे संशोधन करत आहेत. चीनच्या वैज्ञानिकांनी मांडलेल्या अभ्यासानुसार हा ओमिक्रॉनचा व्हेरीएंट हा उंदरामधून निर्माण झाल्याचा अहवाल मांडला आहे. जर्नल ऑफ जेनेटिक्स एण्ड जिनॉमिक्समध्ये हे संशोधन मांडण्यात आले आहे. covid-19 च्या व्हेरीएंटपेक्षा ओमिक्रॉन व्हेरीएंट वेगळा असल्याचेही अहवालात नमुद करण्यात आले आहे.

- Advertisement -

बिजिंगमधील चायनीज अकॅडमी ऑफ सायन्सच्या टीमने केलेल्या संशोधनानुसार ओमिक्रॉन व्हेरीएंट हा उंदराच्या पेशींच्या म्युटेशनमधून तयार झाल्याची शक्यता अभ्यासकांनी वर्तवली आहे. हा व्हायरस उंदराच्या पेशीतील म्युटेशनमधून निर्माण झाल्याचे आयएफएलच्या अहवालात नमुद करण्यात आले आहे. त्यामुळे एका ठराविक वेळेत उंदरातून या ओमिक्रॉन व्हेरीएंटने मानवी शरीरात प्रवेश केला असेल असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामधूनच ओमिक्रनॉचा आऊटब्रेक झाल्याची शक्यता अभ्यासातून वर्तवण्यात आली आहे.

याआधी दक्षिण आफ्रिकेतील वैज्ञानिकांनी ओमिक्रॉन व्हेरीएंटच्या बाबतीत पहिल्यांदा माहिती मांडली होती. पण या ओमिक्रॉन व्हेरीएंटची उत्पत्ती ही नेमकी कुठून झाली, याबाबतची माहिती स्पष्ट होऊ शकलेली नाही. याआधी दक्षिण आफ्रिकेतील वैज्ञानिकांनीच कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तीच्या संसर्गातूनच या व्हायरसची उत्पत्ती झाली असावी असा अंदाज वर्तवला होता.

- Advertisement -

सामान्यपणे आपल्या शरिरातील इम्युनिटी सिस्टिम ही रोगप्रतिकारक शक्तीच्या जोरावर एखाद्या विषाणूला तत्काळ शरिरातून नष्ट करते, अशी प्रतिक्रिया एका दक्षणि आफ्रिकेतील प्राध्यापकाने बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत दिली होती. एखाद्या व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती जेव्हा कमकुवत होते, अशावेळी अशा व्हायरसची उत्पत्ती होण्याची शक्यता असते. त्यामुळेच म्युटेशनचा धोका निर्माण होतो, असेही त्यांनी म्हटले होते. एखाद्या रोग प्रतिकारशक्ती कमी असलेल्या व्यक्तीमध्ये अशा व्हायरसचा मुक्काम हा अनेक दिवसांसाठी असतो, असाही अंदाज त्यांनी मांडला होता.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -