Viral Video: माकडाचा जीव वाचवण्यासाठी कारचालकाने स्वतःचा जीव घातला धोक्यात

On Camera, Car Swerves To Save Monkey, Skids And Falls Off Road In Shimla
Viral Video: माकडाचा जीव वाचवण्यासाठी कारचालकाने स्वतःचा जीव घातला धोक्यात

सोशल मीडियावर बरेच व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ थक्क करतात, तर काही व्हिडिओ हसू अनावर करतात. मात्र सध्या असा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. माकडाचा जीव वाचवण्यासाठी एका कारचालकाने स्वतःसह कुटुंबियांचा जीव धोक्यात घातला आणि सर्वांचा बालंबाल बचाव झाला. ही धक्कादायक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आणि याचाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. ही घटना हिमाचल प्रदेशातील शिमलामध्ये घडली आहे.

नक्की काय घडले?

व्हिडिओमध्ये पाहू शकता की, कार एलिव्हेटेड रोडवरून घसरून पार्किंगमध्ये जाऊन धडकली आणि पाहताच क्षणी खाली पडली. शिमलाच्या हॉटेल हिमलँडच्या पार्किंगमधून ही कार पडली. त्यानंतर कारमध्ये अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी घटनास्थळावरील लोकं धावून गेले. लोकांनी अथक प्रयत्न केल्यानंतर अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात यश आले.

माहितीनुसार, कारमध्ये ४ वर्षीय मुलासह एकाच कुटुंबियातील तीन लोकं प्रवास करत होते. परंतु सुदैवाने या अपघातामध्ये गंभीर जखम कोणाला झाली नाही, सर्वजण बालंबाल बचावले. माहितीनुसार ही कार दिल्लीहून रामपूरला जात होती. पण या घटनेमधून मानवतेचे दर्शन झाले आहे.


हेही वाचा – मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात, चौघांचा मृत्यू