घरताज्या घडामोडीअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना जो बिडेन म्हणाले 'मूर्ख'!

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना जो बिडेन म्हणाले ‘मूर्ख’!

Subscribe

जो बिडेन काही दिवसांनंतर एका कार्यक्रमासाठी मास्क घालून बाहेर पडले होते. त्यावेळेस डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांची ट्विटरच्या माध्यमातून थट्टा केली होती.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे संभाव्य उमेदवार असलेले जो बिडेन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना ‘मूर्ख’ म्हटलं आहे. ते म्हणाले की, ‘ट्रम्प लोकांना चुकीचा सल्ला देऊन मृतांचा आकडा वाढवत आहे. कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे कुशल नेतृत्वाचे लक्षण आहे.’ दोन महिन्यांहून अधिक दिवसांनी पहिल्यांदा जेव्हा ते लोकांच्यामध्ये मास्क घालून बाहेर आले होते तेव्हा बिडेन यांच्यावर ट्रम्प यांनी निशाणा साधला.

गेल्या काही महिन्यांपासून बिडेन डेलावेर येथील त्यांच्या घरी होते. ते माजी सैनिकांच्या स्मारकात पुष्पहार घालण्यासाठी पत्नी जिलसोबत गेले होते. दरम्यान ट्रम्प यांनी मास्क घातलेल्या बिडेन यांचा फोटो रिट्विट करत थट्टा केली होती. यासंदर्भात सीएनएनला दिलेल्या मुलाखतीत बिडेन म्हणाले की, ‘ट्रम्प पूर्णपणे मूर्ख आहे. जो अशाप्रकारे बोलतो.’

- Advertisement -

‘कोरोना विषाणूमुळे एक लाखांहून अधिक अमेरिकेतील लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यातील निम्म्या जणांचा मृत्यू रोखता आला असता. परंतु ट्रम्प यांचा दुर्लक्षपणा आणि अहंकार यात अडथळा आणत आहे’, असे बिडेन म्हणाले.

४ जुलै रोजी स्वातंत्र्यदिनाचा सोहळ्याचे राजधानीत आयोजन करण्याचा विचार ट्रम्प यांनी केला होता. पण डेमोक्रॅटिक पक्षाच्या खासदारांनी कोरोना विषाणूचा मोठा परिणाम या क्षेत्रावर झाला असल्यामुळे एखाद्या मोठ्या सोहळ्यासाठी तयार नाही. पण हा सोहळा होणार असे व्हाइट हाऊसचे प्रवक्ते जड फियर यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ट्विटरने पहिल्यांदाच डोनाल्ड ट्रम्प यांना सांगितले ‘फॅक्ट-चेक’ करायला


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -