शिखर संमेलनासाठी नरेंद्र मोदी इंडोनेशिया दौऱ्यावर, ‘या’ विषयांवर होणार चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी इंडोनेशियातील बाली येथे ४५ तास थांबणार आहे. यावेळी ते २० कार्यक्रमात सहभागी होतील आणि देशभरातील १० जागतिक नेत्यांशी द्विपक्षीय भेट घेणार आहेत. तसंच, इंडोनेशियात असलेल्या भारतीय लोकांशीही मोदी यावेळी चर्चा करण्याची शक्यता आहे.

narendra modi on Indonesia visit

नवी दिल्ली – जी -२० शिखर संमेलनासाठी (G20 summit) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) सोमवारी इंडोनेशिया येथील बाली येथे दाखल झाले. या शिखर संमेलनात भारत, चीन आणि अमेरिकासहीत अनेक देशांचे राष्ट्राध्यक्ष सहभागी होणार आहेत. यामध्ये रशिया-युक्रेन संघर्ष आणि यामुळे जागतिक पातळीवर निर्माण झालेल्या समस्यांवर व्यापक चर्चा होण्याची शक्यता आहे.

या संमेलनासाठी इंडोनेशिया येथे रवाना होण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ‘मी ग्लोबल ग्रोथ, खाद्य, उर्जा सुरक्षा आणि आरोग्यसहित विविध मुद्द्यांवर जागतिक नेत्यांशी चर्चा करणार आहे. तसंच, जागतिक समस्या सोडवण्यासाठी भारत काय करू शकतो यावरही मार्गदर्शन करणार आहे.’

हेही वाचा – उद्योगपतींचे कर्ज माफ पण शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही; राहुल गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी इंडोनेशियातील बाली येथे ४५ तास थांबणार आहे. यावेळी ते २० कार्यक्रमात सहभागी होतील आणि देशभरातील १० जागतिक नेत्यांशी द्विपक्षीय भेट घेणार आहेत. तसंच, इंडोनेशियात असलेल्या भारतीय लोकांशीही मोदी यावेळी चर्चा करण्याची शक्यता आहे.


बाली येथील वेळ भारतापेक्षा अडीच तास पुढे आहे. भारतीय वेळेनुसार सोमवारी १४ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी सायंकाळी ७.३० वाजता बाली विमानतळावर पोहोचले. तर, ८ वाजता ते हॉटेलवर पोहोचले. आज, १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ६.५० मिनिटांनी त्यांनी अपूर्व केम्पिसंकी येथे राष्ट्रपतींकडून त्यांनी स्वागत स्वीकारले.

हेही वाचा – बळजबरीने होणारे धर्मांतर थांबवण्याची गरज, सर्वोच्च न्यायालयाचे मत

भारतीय वेळेनुसार, सकाळी ७ वाजता मोदी कार्य सत्र १ मध्ये सहभागी झाले. या सत्रात खाद्य आणि उर्जा सुरक्षा याविषयांवर चर्चा अपेक्षित आहे. त्यानंतर १० वाजता सर्व नेते अल्पोपहारासाठी एकत्र येणार आहेत. सकाळी ११.३० वाजता ते आरोग्याशी संबंधित मुद्द्यावर कार्यक्रमात सहभागी होतील. दुपारी २.३० वाजता प्राइम प्लाजा, हॉटेल सनुर येथे पोहोचतील. तिथे एक सामूदायिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी ४.३० वाजता वेलकम डिनर आणि सांस्कृतिक कार्यक्रम-गरुड विष्णू केंकाना कल्चरल पार्कमध्ये सहभागी होतील.