घरदेश-विदेशआमच्या लोकशाहीवर..., राहुल गांधींचा परदेशातून पुन्हा एकदा मोदी सरकारवर हल्लाबोल

आमच्या लोकशाहीवर…, राहुल गांधींचा परदेशातून पुन्हा एकदा मोदी सरकारवर हल्लाबोल

Subscribe

नवी दिल्ली : परदेशात राहुल गांधींनी पुन्हा एकदा मोदी सरकारच्या विरोधात सुरू असलेल्या मोहिमेचा एक भाग म्हणून शनिवारी जोरदार हल्लाबोल केला. भारतीय पत्रकार संघाने (आयजेए) आयोजित केलेल्या ‘इंडिया इनसाइट्स’ या कार्यक्रमात बोलताना राहुल गांधींनी भारतीय लोकशाही संरचनेवर ‘क्रूर हल्ले’ होत असल्याचा आरोप केला. तसेच देशासाठी पर्यायी दृष्टीकोनातून एकत्र येण्यासाठी विरोधी पक्षांमध्ये चर्चा सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

भारतात आवाज उठवणाऱ्यांवर दडपशाही होत असल्याचा आरोप राहुल गांधींनी केला. नुकत्याच बीबीसीवर पडलेल्या आयकर धाडीच्या कारवाईचे उदाहरण त्यांनी यावेळी दिले. तसेच देशाला शांत करण्याच्या भारतीय जनता पक्षाच्या (भाजपा) प्रयत्नांविरोधात त्यांनी ‘भारत जोडो यात्रा’ काढल्याचेही ते म्हणाले.

- Advertisement -

भारतीय पत्रकार संघाने (आयजेए) आयोजित केलेल्या ‘इंडिया इनसाइट्स’ या कार्यक्रमात बोलताना राहुल गांधींनी पत्रकारांना सांगितले की, भारतीय लोकशाही संरचनेवर होत असलेल्या क्रूर हल्ल्यामुळे भारतात भारत जोडो यात्रा आवश्यक बनली आहे. प्रसारमाध्यमे, संस्थात्मक संरचना, न्यायव्यवस्था, संसद या सर्वांवर भारतात हल्ले होत आहेत. त्यामुळे लोकांचे प्रश्न सामन्य पद्धतीने मांडणे आम्हाला खूप अवघड जात आहे.

बीबीसीवर नुकतीच आयकर धाड पडली, परंतु असे हल्ले भारतात गेली नऊ वर्षे होत आहेत. पत्रकारांना धमक्या दिल्या जातात, त्यांच्यावर हल्ले होतात. याउलट सरकारची बाजू घेणाऱ्या पत्रकारांना बक्षीसे दिली जातात. हा एक पॅटर्नचा भाग आहे आणि यामुळे काही वेगळे घडण्याची मी अपेक्षा करू शकत नाही.

- Advertisement -

बीबीसीने जर सरकारविरोधात लिहिणे बंद केले तर सर्व काही सामान्य होईल आणि सर्व आरोप रद्द होतील. राहुल गांधींनी खंत व्यक्त करताना म्हटले की, अमेरिका आणि युरोपसह जगातील लोकशाही भाग असलेले देश हे लक्षात घेण्यात अयशस्वी ठरले की, लोकशाहीचा मोठा भाग उद्ध्वस्त झाला आहे.

भारताने शांत राहावे, भारतातील सर्वांनी मौन धारण करावे, असे भाजपला वाटत असल्याचे राहुल गांधी म्हणाले. भारताचे आहे ते घ्यायचे आणि त्यांच्या जवळच्या मित्रांमध्ये वाटायचे. लोकांनी याला विरोध केला की लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवायचे आणि नंतर भारताची संपत्ती तीन, चार, पाच लोकांच्या हाती सोपवायची, हा भाजपचा हेतू आहे.

केंब्रिजमध्येही लोकशाहीवरून आरोप
राहुल यांनी शुक्रवारी केंब्रिज विद्यापीठात व्याख्यान देताना देशाची लोकशाही धोक्यात असल्याचा आरोप केला होता. याशिवाय पेगाससद्वारे त्यांच्यावर आणि विरोधी नेत्यांवर लक्ष ठेवले जात असल्याचाही आरोप त्यांनी केला. त्यांच्या या व्याख्यानावरून भारतात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. त्यांचे वक्तव्य म्हणजे देशाची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न असल्याचे भाजपने म्हटले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -