घरदेश-विदेशहनुमान जयंतीच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाकडून राज्यांना मार्गदर्शनक सूचना जारी

हनुमान जयंतीच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाकडून राज्यांना मार्गदर्शनक सूचना जारी

Subscribe

हनुमान जयंतीच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. समाजकंटकांवर लक्ष ठेवण्याचे आदेश या मार्गदर्शक सुचनेतून देण्यात आल्या आहेत. 

हनुमान जयंतीच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. केंद्राने जारी केलेल्या गाईडलाईन्समध्ये हनुमान जयंतीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राज्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. खास करुन समाजकंटकांवर लक्ष ठेवण्याचे आदेश या मार्गदर्शक सुचनेतून देण्यात आल्या आहेत.

राज्यात ज्यामुळे जातीय सलोखा बिघडू शकतो, अशा सर्वच घटकांवर लक्ष ठेवण्याबााबत केंद्राकडून सांगण्यात आले आहे. गुरुवारी हनुमान जयंती आहे. यापूर्वी रामनवमीच्या दिवशी मिरवणुकीत अनेक राज्यांत हिंसाचार झाला होता. पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये हिंसाचाराने उग्र रूप धारण केले होते. गृहमंत्रालयाने या दोन्ही राज्यांकडून अहवाल मागवला आहे. On the occasion of Hanuman Jayanti,the Ministry of Home Affairs has issued guidelines to the states pup

- Advertisement -

केंद्रीय गृहमंत्रालयाने ट्वीट करुन या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. राज्य सरकारांनी राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखावी. शांततेत उत्सव साजरा करावा. समाजात धार्मिक आणि जातीय तेढ निर्माण करणाऱ्या समाजकंटकांवर लक्ष ठेवा. तसेच, धार्मिक आणि जातीय तेढ निर्माण होणार नाही, याची काळजी घ्या, असे या मार्गदर्शक सूचनेत केंद्रीय गृहमंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

आधीही झाल्यात दंगली

गुरुवारी हनुमान जयंती होत असल्याने दिल्ली पोलीसही सतर्क झाले आहेत. दिल्ली पोलिसांच्या जवानांनी हनुमान जयंतीच्या पूर्वीच जहांगीरपुरी परिसरात फ्लॅग मार्च काढला. जहांगीरपुरीमध्ये दिल्ली पोलिसांशिवाय पॅरा मिलिट्री फोर्सचे जवानही यावेळी उपस्थित होते. गेल्या वर्षी जहांगीरपुरी परिसरातील जी ब्लाॅकमध्ये हनुमान जयतींच्या शोभा यात्रेवर दगडफेक करण्यात आली होती. त्यामुळे दंगल भडकली होती. मशिदीसमोरुन ही शोभायात्रा निघाली होती.

- Advertisement -

( हेही वाचा: उद्धव ठाकरे हे दगाबाज, विक्षिप्त, खोटारडे; नारायण राणेंचा ठाकरेंवर घणाघात )

पश्चिम बंगालमध्ये रामनवमीच्या दिवशी दंगल

पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये रामनवमीच्या दिवशी हिंसा भडकली होती. समाजकंटकांनी या दोन्ही जिल्ह्यात प्रचंड दगडफेक केली होती. तसेच, अनेक ठिकाणी जाळपोळ केली होती. त्यामुळे पोलिसांना जमावाला पांगवताना लाठीमार करावा लागला होता. मात्र, जमाव मोठ्या प्रमाणावर असल्याने त्यांना आवरणे पोलिसांना अशक्य झाले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -