घर ताज्या घडामोडी ट्विटरवर एलॉन मस्कने बायडनला वगळून पंतप्रधान मोदींना केलं फॉलो

ट्विटरवर एलॉन मस्कने बायडनला वगळून पंतप्रधान मोदींना केलं फॉलो

Subscribe

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या एलॉन मस्कने जो बायडन यांना वगळून पंतप्रधान नरेंद्र मोदींना ट्विटरवर फॉलो केलं आहे. एलॉन मस्क यांच्या अकाउंटवर नजर ठेवणाऱ्या व्हेरीफाइड Elon Alertsट्विटर अकाउंटने याबाबत माहिती दिली आहे.

ट्विटरवर सुमारे 134.3 दशलक्ष लोक मस्क यांना फॉलो करतात. त्या तुलनेत मस्क केवळ 194 लोकांना फॉलो करतात, ज्यामध्ये आज पीएम मोदींचे नावही जोडले गेले. परंतु सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मस्क हे त्यांच्याच देशाचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना ट्विटवर फॉलो करत नाहीत.

- Advertisement -

जेव्हापासून एलॉन मस्कने भारताच्या पंतप्रधानांना फॉलो केले आहे. तेव्हापासून वापरकर्ते नवीन अंदाज लावत आहेत. काही लोकांचा असा विश्वास आहे की, मस्क लवकरच टेस्ला कार भारतात आणू शकतात. त्यामुळेच त्यांनी पीएम मोदींची पाठराखण केली आहे. अलीकडेच बराक ओबामांना मागे टाकत एलॉन मस्क यांचे ट्विटरवर सर्वाधिक फॉलोअर्स बनले आहेत. सध्या 134.3 दशलक्ष युझर्स त्यांना फॉलो करतात. तर बराक ओबामा यांचे 133.04 दशलक्ष फॉलोअर्स आहेत.

एलॉन मस्क यांनी गेल्या वर्षी 44 अब्ज डॉलर्समध्ये ट्विटर विकत घेतले होते. तेव्हापासून कंपनी आणि प्लॅटफॉर्ममध्ये अनेक मोठे बदल करण्यात आले आहेत. या बदलांमध्ये कंपनीचे जुने सीईओ पराग अग्रवाल यांना हटवण्याचाही समावेश आहे.

- Advertisement -

नव्या लोगोमुळे युजर्स हैराण

काही दिवसांपूर्वी एलॉन मस्क यांनी ट्विटरची मालकी घेतल्यापासून ट्विटर ही मायक्रो ब्लॉगिंग साईट सातत्याने चर्चेत आहे. मस्क यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून निळ्या चिमणीऐवजी पिवळ्या रंगाचा डोज डॉग या कुत्र्याचा फोटो शेअर केला. त्यानंतर क्षणाधार्थ युजर्सच्या ट्विटर हँडलवरून निळी चिमणी जाऊन तिच्या जागी डोज डॉग आला. अचानक लोगोत झालेल्या या बदलामुळे युजर्स हैराण झाले आहेत.

इंटरनेटवरील प्रसिद्ध कुत्रा

ट्विटरच्या लोगोमध्ये दिसणारा डोज डॉग मिम्सच्या जगात खूप प्रसिद्ध आहे. खरंतर ही एक कुत्री आहे. तिचे मूळ नाव काबोसू असे आहे. 2010 साली या कुत्रीचा फोटो इंटरनेटवर व्हायरल झाल्यावर युजर्सने त्याला खूपच पसंत केले. इतके की, 2013 मध्ये दोन प्रोगाम्रर्सनी त्यांच्या क्रिप्टोकरन्सीचे नाव डॉजकॉईन असे ठेवले आणि त्यावर काबोसूचा फोटो वापरला. मस्क या क्रिप्टोकरन्सीचा पाठीराखा आहे. त्याने या क्रिप्टोकरन्सीचा फोटो शेअर करताच या करन्सीच्या मूल्यात प्रचंड वाढ झाली. आताही मस्कने या कुत्रीचा फोटो वापरल्याने तसेच होण्याची शक्यता आहे.


हेही वाचा : 20 हजार कोटी रुपये आले कुठून? राहुल गांधींच्या प्रश्नाला अदानी समूहाने दिले उत्तर


 

- Advertisment -