Wednesday, May 31, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश WHO कडून मिळाला पुन्हा एकदा धोक्याचा इशारा; 'या' आजारापासून राहण्यास सांगितले सावध

WHO कडून मिळाला पुन्हा एकदा धोक्याचा इशारा; ‘या’ आजारापासून राहण्यास सांगितले सावध

Subscribe

गेल्या दोन वर्षांपासून राज्यात कोरोना महामारीनंतर हाहाकार माजवला आहे. अद्यापही या आजाराचा धोका कमी झालेला नसताना आता आणखी एका आजाराने डोके वर काढलेले आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHO कडून सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

2020 पासून देशभरात थैमान घातलेल्या कोरोना महामारीमुळे अनेकांना आपले जीव गमवावे लागले होते. अद्यापही या आजाराचा धोका देशभरातून कमी झालेला नाही. परदेशात आजही कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. अशातच आता जागतिक आरोग्य संघटनेकडून (WHO-World Health Organization) पुन्हा एकदा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. बर्ड फ्लू या आजराने आता डोके वर काढल्याने चिंता वाढली आहे. याआधी देखील देशात बर्ड फ्लू आजाराने लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले होते.

आता पक्षांव्यतिरिक्त इतर सस्तन प्राण्यांमध्येही बर्ड फ्लूचा पसरला असल्याचे सांगण्यात येत आहे. मिंक (Mink), ऑटर (Otters), कोल्हा (Fox), सील (Sea lions) या सस्तन प्राण्यांनाही H1N1 फ्लूचा म्हणजेच बर्ड फ्लूचा संसर्ग झाला आहे. याबाबत जागतिक आरोग्य संघटनेने चिंता व्यक्त करत सांगितले आहे की, सस्तन प्राण्यांमधील बर्ड फ्लूचा संसर्ग पाहता मानवांमध्ये देखील बर्ड फ्लू संसर्ग होण्याचा धोका आहे, कारण मानव देखील एक प्रकारचा सस्तन प्राणी आहे.

- Advertisement -

जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, सध्या तरी हा आजार फारसा फैलावला नसल्याने अद्याप तरी याचा धोका कमी आहे. पण याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. कारण सस्तन प्राण्यांप्रमाणेच मानवाला सुद्धा याचा धोका होऊ शकतो. त्यामुळे मानवांनी सतर्क राहण्याची गरज आहे.

तसेच जागतिक आरोग्य संघटनेकडून या आजारापासून बचाव करण्यासाठी काही सूचना करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार, कोणत्याही आजारी किंवा मृत वन्य प्राणी किंवा पक्ष्याला स्पर्श करू नका किंवा त्याच्या जवळ जाऊ नका. असा प्राणी आढळल्यास स्थानिक अधिकारी किंवा प्रशासनाला याबाबतची माहिती द्या. यासोबतच आजारी किंवा मृत कोंबड्यांबाबत जास्त खबरदारी बाळगण्याची आणि काळजी घेण्याची गरज आहे, असेही WHO ने सांगितले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – धक्कादायक! पुण्यात दुहेरी हत्याकांड; आरोपीला पोलिसांकडून अटक

डब्ल्यूएचओ प्रमुखांनी पुढे बोलताना सांगितले की, ‘बर्ड फ्लू हा मानवी आरोग्यासाठी सतत धोका आहे. भविष्यात यामुळे साथीचा रोग पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. या फ्लूमुळे साथीचे रोग पसरू शकतात. त्यामुळे यावर लक्ष ठेवणं महत्वाचं आहे. या विषाणूमधील मानवी आरोग्यावर परिणाम करणारे कोणतेही बदल जाणून घेण्यासाठी प्राण्यांमध्ये पाळत ठेवणं महत्त्वाचं आहे.’

कसा पसरतो बर्ड फ्लू?
डब्ल्यूएचओने सांगितल्याप्रमाणे, बर्ड फ्लू संक्रमित पक्ष्यांना स्पर्श करून, संक्रमित प्राण्यांच्या विष्ठेला किंवा राहण्याच्या जागेच्या संपर्कात आल्यावर आणि ज्या प्राण्यांना, पक्ष्यांना या आजाराचा संसर्ग झाला आहे, असे प्राणी-पक्षी खाल्ल्यास हा आजार होऊ शकतो. डब्ल्यूएचओचे प्रवक्ते ख्रिश्चन लिंडमेयर यांनी सांगितले की, गेल्या वर्षी जगभरात चार जणांना एव्हियन फ्लूची (H5N1) लागण झाली होती, त्यापैकी एकाचा मृत्यू झाला.

- Advertisment -