घरताज्या घडामोडीमुख्यमंत्री योगी आदित्यनाथांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी; पोलिसात गुन्हा दाखल

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी; पोलिसात गुन्हा दाखल

Subscribe

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. फेसबुकवर मेसेजद्वारे पोस्ट टाकून शिरच्छेद करण्याची धमकी योगी आदित्यनात यांना देण्यात आल्याचे समजते.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. फेसबुकवर मेसेजद्वारे पोस्ट टाकून शिरच्छेद करण्याची धमकी योगी आदित्यनात यांना देण्यात आल्याचे समजते. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, तपासाला सुरूवात केली आहे. (once again threat to up cm yogi adityanath)

मागील दोन वर्षात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जवळपास 11 वेळा जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती मिळते. योगींना धमकी दिल्याप्रकरणी आतापर्यंत 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, आता योगींना जी धमकी देण्यात आली आहे, त्या धमकीबद्दल पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, यूपीच्या मुख्यमंत्र्यांचा शिरच्छेद करण्याची धमकी देणारी पोस्ट मिळाली आहे. फेसबुकवर मुरादाबाद पोलिसांच्या नावाने एक फेक पेज तयार करण्यात आले असून, त्यावरून अशा पोस्ट करण्यात आल्या आहेत.

याप्रकरणी तपास केला असता पोलिसांना एका आत्मप्रकाश पंडित नावाच्या अकाऊंटवरून ही पोस्ट केल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी पोलिसांनी त्याची चौकशी केली असता, खाते हॅक करून कोणीतरी हे काम केल्याचे आत्मप्रकाश पंडित यांनी सांगितल्याचे समजते. शिवाय, ज्या पेजवरून मुख्यमंत्र्यांना धमकी देण्यात आली आहे, त्या पेजवर पाकिस्तानचा झेंडा आहे. त्यात पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचाही फोटो आहे.

- Advertisement -

या पोस्टच्या संदर्भात एका ट्विटर युजरने ही बाब पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर यूपी पोलिसांचा सायबर सेल सक्रिय झाले असून तपासाला सुरूवात केली. दरम्यान, याआधीही योगी आदित्यनाथ यांनी धमकी देण्यात आली होती. गेल्या दोन वर्षांत ही 11वी वेळ आहे. धमकी प्रकरणी आतापर्यंत 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या क्रमातील पहिली धमकी 24 एप्रिल 2020 रोजी देण्यात आली होती.


हेही वाचा – इक्बाल कासकर जेजे रुग्णालयात दाखल

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -