घरदेश-विदेशछत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या एक दिवस आधी ६ बॉम्बस्फोट

छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या एक दिवस आधी ६ बॉम्बस्फोट

Subscribe

छत्तीसगडच्या कंकार कोयली बेडामध्ये असणाऱ्या गट्टकल आणि गोमगावाच्यामध्ये ६ ठिकाणी नक्षलवाद्यांनी बॉम्ब पूरून ठेवले होते. गस्ती दरम्यान एका बॉम्बचा स्फोट झाल्यामुळे एक जवान जखमी झाला.

छत्तीसगडमध्ये विधानसभा निडणुकीच्या तोंडावर नक्षलवाद्यांच्या कारवाया सुरुच आहे. छत्तीसगडमध्ये उद्या विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्याचे मतदान होणार आहे. त्याच्या आदल्या दिवशीच नक्षलवाद्यांनी हिंसाचाराला सरुवात केली आहे. कांकेरे येथे नक्षलवाद्यांनी सहा आयईडी बॉम्बस्फोट घडवून आणले आहेत. या आयईडी बॉम्बस्फोटामध्ये बीएसएफचा एक जवान जखमी झाला आहे. कंकार कोयली बेडामध्ये असणाऱ्या गट्टकल आणि गोमगावाच्यामध्ये ६ ठिकाणी नक्षलवाद्यांनी बॉम्ब पूरून ठेवले होते. गस्ती दरम्यान एका बॉम्बचा स्फोट झाल्यामुळे एक जवान जखमी झाला.

- Advertisement -

अशी घडली घटना

छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्यात रविवारी सकाळी नक्षलवाद्यांनी बीएसएफच्या गस्तीवर जाणाऱ्या पथकावर आयईडीद्वारे हल्ला केला. नक्षलवाद्यांनी सहा आयईडी स्फोट घडवून आणले. या हल्ल्यात जवान महेंद्र सिंह जखमी झाले आहेत. दरम्यान, नक्षलवलग्रस्त बीजापूर जिल्ह्यामध्ये जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत एका नक्षलवाद्याला ठार करण्यात जवानांना यश आले. तर एका नक्षलवाद्याला पकडण्यात आला आहे. घटनास्थळावरुन मोठ्याप्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.

नक्षलग्रस्त भागावर ड्रोनची नजर

एन्टी नक्षल ऑपरेशनचे डीआयडी पी सुंदरराज यांनी सांगितले की, नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या स्फोटामध्ये एक जवान महिंद्र सिंह जखमी झाले आहे. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. दरम्यान जवानांकडून परिसरामध्ये सर्च ऑपरेशन सुरु आहे. विधानसभा निवडणुकीला लक्षात घेता ड्रोनच्या मदतीने नक्षलग्रस्त भागामध्ये करडी नजर ठेवली जात आहे. सर्वात जास्त नक्षलग्रस्त भाग असणाऱ्या अबूझमाडमध्ये ड्रोनच्या मदतीने नक्षलग्रस्तांवर नजर ठेवली जात आहे. कौशलनारमध्ये नक्षलवादी असल्याचे ड्रोनच्या मदतीने लक्षात आले. जेव्हा नक्षलवाद्यांनी ड्रोनला पाहिले तेव्हा ते त्याठिकाणावरुन फरार झाले.

- Advertisement -

उद्या होणार पहिल्या टप्प्याचे मतदान

छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी १२ नोव्हेंबरला सोमवारी मतदान होणार आहे. त्यामुळे नक्षलग्रस्त भागामध्ये करडी नजर ठेवली जात आहे. नक्षलवाद्यांनी काही दिवसापूर्वी दुरदर्शनच्या गाडीवर हल्ला केला होता. यामध्ये दोन जवान शहीद झाले होते तर दूरदर्शनच्या एका कॅमेरामॅनचा मृत्यू झाला होता. निवडणुक असल्यामुळे नक्षलवादी आणि जवानांमध्ये राज्यभर चकमक होत आहे. बीजापूर परिसरातही शनिवारी एक जवान शहीद झाला. मागच्या आठवड्यात जवानांनी कारवाई करत तब्बल ३०० आयईडी बॉम्ब जप्त केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -