घरदेश-विदेशJ&K: श्रीनगरमध्ये CRPF च्या पेट्रोलिंग पार्टीवर दहशतवादी हल्ला; १ जवान शहीद, ३...

J&K: श्रीनगरमध्ये CRPF च्या पेट्रोलिंग पार्टीवर दहशतवादी हल्ला; १ जवान शहीद, ३ जखमी

Subscribe

जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरच्या लावापोरा येथे सीआरपीएफच्या पथकावर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यात एक जवान शहीद झाला तर ३ जवान जखमी झाले आहेत. सीआरपीएफच्या प्रवक्त्याने सांगितले की, दहशदवादी आपले कर्तव्य बजावत असताना E73 बटालियनला लक्ष्य केले. या हल्ल्यानंतर या भागात शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. जखमी जवानांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याचबरोबर दहशतवाद्यांना पकडण्यासाठी संपूर्ण परिसराला घेराव घालण्यात आला आहे. शहीद जवानांचे नाव एएसआय मंगा राम बरमन असे असून तो त्रिपुराचा रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisement -

काश्मीरचे आयजी विजय कुमार यांनी वृत्तसंस्था एएनआयला दिलेल्या माहिती नुसार, या हल्ल्यात एक सीआरपीएफ जवान शहीद झाला आहे आणि तीन जवान जखमी झाले आहेत. या हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाचा सहभाग असल्याचेही त्यांनी सांगितले. दहशतवाद्यांनी परिम्पोरा पोलिस ठाण्यांतर्गत लावापोरा येथे केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) जवानांना गोळ्या घालून लक्ष्य केले, असेही पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

 

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -