Wednesday, June 23, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी एक तास लवकर झोपा, डिप्रेशनचा धोका २३ टक्क्यांनी कमी करा - संशोधन

एक तास लवकर झोपा, डिप्रेशनचा धोका २३ टक्क्यांनी कमी करा – संशोधन

Related Story

- Advertisement -

वेळेत झोप घेणे ही निरोगी आरोग्यासाठी उत्तम अशी बाब आहे. त्यानुसारच आता नव्या संशोधनानुसार नेहमीच्या वेळेपेक्षा तासभर आधी झोपेतून उठण्याची सवय ही गंभीर डिप्रेशनमधून बाहेर टाकण्यासाठी उपयुक्त ठरू शकते ही बाब समोर आली आहे. जवळपास २३ टक्क्यांनी डिप्रेशनचा धोका या सवयीमुळे टाळणे शक्य असल्याचेही अभ्यासात नमुद करण्यात आले आहे. युनिवर्सिटी ऑफ कोलोरॅडो, बाऊल्डर, बोर्ड इंस्टिट्यूट ऑफ MIT आणि हार्वर्ड या विद्यापिठांमध्ये झालेल्या अभ्यासानुसार हे संशोधन समोर आले आहे. जवळपास ८ लाक ४० हजार व्यक्तींचा संशोधनामध्ये समावेश करण्यात आला होता. जामा सायकीएट्री जरनलमध्ये हे संशोधन समोर आले आहे. या संशोधनानुसार व्यक्तीच्या दररोज झोपण्याच्या सवयीचा अभ्यास करण्यात आला. कारण झोपेच्या सवयी या डिप्रेशनसाठी मुख्यत्वेकरून कारणीभूत आहेत.

या अभ्यासादरम्यान संशोधकांनी एका डीएनए टेस्टिंग कंपनीच्या माध्यमातून यूके बायोबॅंकच्या माध्यमातून हा डेटा गोळा करण्यात आला. मेंडेलियन रॅण्डमायजेशनच्या माध्यमातून जेनेटिकचा संबंध शोधण्यासाठी ही पद्धती वापरली गेली. आपले जेनेटिक्स हे जन्माच्या वेळीच निश्चित झालेले असतात. त्यामुळेच जेनेटिक्सच्या माध्यमातूनच कारण आणि परिणाम अभ्यासणासाठी हा अभ्यास करण्यात आला. साधारणपणे १२ ते ४२ टक्के जेनेटिक्सच्या एकत्रित प्रभावामुळे आपल्या झोपेच्या वेळेची निश्चिती ठरते.

- Advertisement -

Sleep Tracker

संशोधकांनी अभ्यासाच्या निमित्ताने जवळपास ८ लाख ५० हजार व्यक्तींचा जेनेटिक वेरीयंट डेटा गोळा केला. या व्यक्तींना झोपेसाठीचे स्लीप ट्रॅकर लावण्यात आले. तसेच सर्वेक्षणात सहभागी अडीच लाख जणांनी या सर्वेक्षणात प्रश्नावलीला उत्तरे दिली. या सर्वेक्षणात अनेकांनी सकाळी झोपी जात असल्याचे सांगितले. तर ९ टक्के लोकांनी रात्री जागरण करत असल्याचे कबुल केले आणि उशिरा झोपणाऱ्यांचाही यामध्ये समावेश होता. झोपी जाणाऱ्यांमध्ये सरासरी पहाटे ३ वाजता त्यांच्या झोपेचमी मध्यरात्र होती. या व्यक्ती रात्री ११ वाजता झोपी जाऊन सकाळी ६ वाजता जाग येणाऱ्या होत्या.

- Advertisement -

या डेटाच्या माध्यमातून संशोधकांनी वेगवेगळ्या सॅम्पल्सच्या माध्यमातून जेनेटिक माहिती गोळा केली. या सगळ्या माहितीच्या माध्यमातून स्टॅस्टिस्टिकल टेक्निकच्या माध्यमातून जेनेटिक वेरीयंट हे व्यक्तीला लवकर उठवण्यासाठी कारणीभूत ठरते असे लक्षात आले. तसेच यामुळेच डिप्रेशनचा धोकाही कमी होतो. ज्या व्यक्ती रात्री १ वाजता झोपायला जातात त्या व्यक्ती २३ टक्क्यांनी डिप्रेशनचा धोका कमी करतात.तर ज्या व्यक्ती ११ वाजता झोपायला जातात अशा व्यक्ती ४० टक्क्यांनी हा धोका कमी करतात असे संशोधनातून समोर आले आहे. ज्या व्यक्ती लवकर झोपतात अशा व्यक्तींना डिप्रेशनचा धोका कमी असतो. तर ज्या व्यक्ती उशिरा झोपतात अशा व्यक्तींमध्ये हा धोका वाढत जातो.

- Advertisement -