घरताज्या घडामोडीDelta Variantचा कहर! अमेरिकेत हॉस्पिटलमध्ये अवघे ५ टक्के ICU बेड्स शिल्लक

Delta Variantचा कहर! अमेरिकेत हॉस्पिटलमध्ये अवघे ५ टक्के ICU बेड्स शिल्लक

Subscribe

भारतात आढळलेल्या कोरोनाचा डेल्टा व्हेरियंट आता अनेक देशांसाठी डोक्याचा ताप झाला आहे. अनेक देशांमध्ये डेल्टा व्हेरियंटच्या केसेस झपाट्याने वाढत आहे. याच दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेने देखील डेल्टा व्हेरियंट जगातील सर्वाधिक परिणामकारक व्हेरियंट असल्याचे म्हटले आहे. ज्या वेगाने डेल्टा व्हेरियंट जगभरात पसरत आहे, त्याच अनुषंगाने डब्ल्यूएचओने हा दावा केला आहे. सध्या महासत्ता असलेल्या अमेरिकेत कोरोनाच्या केसेस वाढण्याचे कारण डेल्टा व्हेरियंट आहे. यामुळे अमेरिकेतील अनेक हॉस्पिटल्समध्ये अवघे ५ टक्के आयसीयू बेड्स शिल्लक राहिले आहेत, याबाबतचा डेटा द न्यूयॉर्क टाईम या वृत्तसंस्थेने जाहीर केला आहे.

द न्यूयॉर्क टाईम्सने अमेरिकेतील हॉस्पिटलमधील आयसीयू बेड्सचा डेटा प्रकाशित केला आहे. यामध्ये खाली दिलेल्या नकाशात पाहू शकता की, अमेरिकीत आयसीयू बेड्स भरलेले दाखवले आहेत. हिवाळात आलेली लाट नियंत्रणात आल्यानंतर आता आलेल्या नवीन लाटेमुळे परिस्थिती पुन्हा एकदा बिघडली झाली आहे. अमेरिकेत कोरोनाबाधितांची संख्या वाढल्यामुळे पाच पैकी एक हॉस्पिटलमध्ये ९५ टक्के आयसीयू बेड्स शिल्लक राहिले आहेत. उन्हाळ्यात कोरोना केसेसमध्ये वाढ झाल्यामुळे सात राज्यांमध्ये कोरोना रुग्ण हॉस्पिटलमध्ये भरती होण्याची संख्या शिगेला पोहोचली आहे.

- Advertisement -

वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, अमेरिकेत आतापर्यंत ३ कोटी ७८ लाख ९६ हजारांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यापैकी आतापर्यंत ६ लाख ४० हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३ कोटी २ लाखांहून अधिक जण कोरोनामुक्त झाले आहेत. अमेरिकेत सर्वाधिक कोरोना रुग्ण कॅलिफोर्नियामध्ये आढळले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – कोरोनाचा Delta व्हेरिएंट जगभरात सर्वाधिक परिणामकारक ठरेल, WHO चा इशारा


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -