घर देश-विदेश One Nation, One Election : ...अशा अफवा पसरवण्याची गरज काय? पृथ्वीराज चव्हाणांचा...

One Nation, One Election : …अशा अफवा पसरवण्याची गरज काय? पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल

Subscribe

मुंबई : विरोधकांची आघाडी असलेल्या ‘इंडिया’ची दोन दिवसीय बैठक मुंबईतली ग्रॅण्ड हयात या पंचतारांकित हॉटेलमध्ये कालपासून (गुरुवार) सुरू आहे. अशातच केंद्र सरकारने 18 ते 22 सप्टेंबर दरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. त्यात ‘एक देश एक निवडणूक’ विधेयक आणण्यात येणार असल्याचे सांगितले जाते. यावरून माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी, अशा अफवा पसरवण्याची गरज काय? असा सवाल केला आहे.

- Advertisement -

आगामी लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (NDA) आव्हान देण्यासाठी प्रमुख विरोधक एकवटले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत रालोआ विरोधात विरोधकांची आघाडी ‘इंडिया’ अशी लढत होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळेच आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडायला सुरुवात झाली आहे. इंडियाच्या बैठकीमुळे केंद्र सरकार अस्वस्थ झाले आहे. त्यामुळेच लोकांचे लक्ष वळविण्यासाठी अशा गोष्टी केल्या जात असल्याचा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

हेही वाचा – मोदी द्वेषाने पछाडलेली ही विरोधकांची टोळी; मुख्यमंत्री शिंदेचा घणाघात

- Advertisement -

या अधिवेशनाच्या निमित्ताने अफवा देखील पसरवल्या जात आहे. या अधिवेशनात समान नागरी कायद्याचे विधेयक ते आणणार असल्याचे सांगितले जाते. पण, नेमका तो कायदा काय आहे? त्याचा मसुदा काय आहे? काय करणार आहेत? काहीच माहीत नाही, असे त्यांनी सांगितले. या अधिवेशनात महत्त्वाची विधेयके आणली जाणार असल्याचेही सांगितले जात आहे; ती कोणती आहेत ते तरी सांगा! असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा – ‘एक देश, एक निवडणूक’साठी ‘या’ माजी राष्ट्रपतींच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन

त्यांनी ‘वन नेशन वन इलेक्शन’ धोरणावरही टीका केली. एक देश एक निवडणूक विधेयक आणण्यात येणार असल्याची अफवाही पसरवण्यात आली आहे. सरकारला पाहिजे तेव्हा निवडणुका घेण्याचा अधिकार आहे, असे माझे मत आहे. मे 2024मध्ये लोकसभा निवडणुका आहेत, त्या लवकर घ्यायच्या असतील तर, सरकार त्या घेऊ शकतात. यावर्षी आणि पुढील वर्षी होऊ घातलेल्या विविध राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसोबत लोकसभा निवडणूक घ्यायची असेल तर, सरकार ती घेऊ शकते. त्यासाठी कायदा मंजूर करण्याची गरज नाही. मग अफवा पसरवण्याची गरज काय? असा सवाल त्यांनी केला आहे.

- Advertisment -