Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत एक सैनिक शहीद, दोनजण जखमी; तीन दिवसांपासून सुरू आहे गोळीबार

दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत एक सैनिक शहीद, दोनजण जखमी; तीन दिवसांपासून सुरू आहे गोळीबार

Subscribe

अनंतनागमध्ये दहशतवाद्यांविरोधात कारवाई सुरूच आहे. यातच दोन दहशतवाद्यांना भारतीय सैनिकांनी घेरलेले असून, क्वाडकॉप्टर आणि ड्रोनच्या सहाय्याने दहशतवाद्यांवर नजर ठेवली जात आहे. पॅरा कमांडोजनीही कारवाईची जबाबदारी स्वीकारली आहे.

नवी दिल्ली : काश्मीरच्या दक्षिण भागात मागील तीन दिवसांपासून दहशतवाद्यांसोबत चकमक सुरू आहे. यादरम्यान आज दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील कोकरनागच्या गदुल जंगलात सलग तिसऱ्या दिवशी दहशतवाद्यांना ठार मारण्याची कारवाई सुरू असताना झालेल्या चकमकीत जखमी झालेल्या आणखी एका सैनिकाचा मृत्यू झाला. तर दोन जवान जखमी झाले आहेत. ज्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.(One soldier martyred two injured in encounter with terrorists The firing has been going on for three days)

अनंतनागमध्ये दहशतवाद्यांविरोधात कारवाई सुरूच आहे. यातच दोन दहशतवाद्यांना भारतीय सैनिकांनी घेरलेले असून, क्वाडकॉप्टर आणि ड्रोनच्या सहाय्याने दहशतवाद्यांवर नजर ठेवली जात आहे. पॅरा कमांडोजनीही कारवाईची जबाबदारी स्वीकारली आहे. घनदाट जंगल आणि डोंगराळ भाग यामुळे हे विशेष पथक तैनात करण्यात आले आहे. याशिवाय ज्या टेकडीवर दहशतवादी लपून बसल्याचा संशय होता तेथे रॉकेट डागण्यात आले आहे. त्यामध्ये उझैर खानसह लष्कराच्या दोन दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी घेरले असल्याचे सांगण्यात येत आहे.

बुधवारपासून गोळीबार सुरूच

- Advertisement -

बुधवारी रात्रीनंतर गुरुवारी सकाळी 6 वाजता सुरक्षा दलांनी पुन्हा दहशतवाद्यांविरोधात कारवाई सुरू केली. या काळात सकाळपासून रात्री उशिरापर्यंत अधूनमधून गोळीबार सुरू आहे. दहशतवाद्यांशी संपर्क प्रस्थापित करण्यासाठी, सुरक्षा दलांनी अत्याधुनिक तंत्रज्ज्ञांचा वापर सुरू केला आहे. परंतु दुसऱ्या बाजूने कोणतीही प्रत्युत्तर आले नाही हे विशेष.

तीन अधिकाऱ्यांनी दिली प्राणाची आहुती

दहशतवाद्यांशी सुरू असलेल्या चकमकीत कर्नल मनप्रीत सिंग, मेजर आशिष धोनक आणि डीएसपी हुमायून भट यांनी या ऑपरेशन दरम्यान आघाडीचे नेतृत्व करताना आपल्या प्राणांची आहुती दिली. भारतीय सैन्याने उझैर खानसह 2 दहशतवाद्यांना घेरले आहे.

- Advertisement -

हेही वाचा : उद्धव ठाकरे यांच्यानंतर आता आदित्यही शेतीच्या बांधावर; मराठवाड्यातील शेतकऱ्यांशी साधणार संवाद

संयुक्तरित्या केली जात आहे कारवाई

कोकरनागच्या गडुल जंगलात दहशतवाद्यांच्या हालचालींबाबत माहिती मिळाल्यानंतर लष्कराच्या 19 राष्ट्रीय रायफल्स (RR), जम्मू-काश्मीर पोलीस आणि CRPF यांच्या संयुक्त पथकाने बुधवारी पहाटे शोध मोहीम सुरू केली होती. घेराबंदी दरम्यान, जंगल परिसरात लपलेल्या दहशतवाद्यांनी संयुक्त पथकावर जोरदार गोळीबार केला. या चकमकीत लष्कराचे 19 आरआर कमांडिंग ऑफिसर कर्नल मनप्रीत, मेजर आशिष धोनक आणि जम्मू-काश्मीर पोलिसांचे डीएसपी ऑपरेशन हुमायून भट शहीद झाले.

हेही वाचा : Birth certificate : 1 ऑक्टोबरपासून बदणार नियम बदलणार; सरकार दरबारी फक्त जन्मप्रमाणपत्र महत्त्वाचे

दहशतवादी उझैरवर दहा लाखांचे बक्षिस

या हल्ल्यात सहभागी असलेला उझैर खान (28) हा कोकरनागच्या नागम गावचा रहिवासी आहे. 26 जुलै 2022 पासून तो बेपत्ता होता. त्यावेळी तो लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी बनला होता, असे सांगितले जाते. उझैरचा अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये सहभाग आहे. त्यामुळे त्याला A+ श्रेणीत ठेवण्यात आले आहे. त्याच्यावर 10 लाखांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले आहे. घटनास्थळी त्याच्यासोबत एक विदेशी दहशतवादीही आहे, त्याची ओळख अद्याप पटलेली नाही.

- Advertisment -