घरदेश-विदेशजम्मू काश्मीर: त्रालमध्ये पुन्हा चकमक; एका दहशतवाद्याला कंठस्नान

जम्मू काश्मीर: त्रालमध्ये पुन्हा चकमक; एका दहशतवाद्याला कंठस्नान

Subscribe

सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये पुन्हा चकमक

जम्मू-काश्मीरमधील त्रालमध्ये आज पुन्हा एकदा सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आलं आहे. कालपासून चकमक सुरू आहे. रात्री ही कारवाई थांबवल्यानंतर सुरक्षा दलाने पुन्हा सकाळी दहशतवाद्यांविरूद्ध कारवाई सुरू केली. या भागात २ ते ३ दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलाल मिळाली आहे.

दहशतवादी त्रालच्या चेवा उल्लार भागात लपून बसल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिस, सैन्य आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने या भागात शोध मोहीम राबवली. यावेळी दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार सुरू केला. यानंतर सुरक्षा दलानेही प्रत्युत्तर देत गोळीबार सुरु केला. या चकमकीत जवानांनी एका दहशतवाद्याला ठार केलं आहे.

- Advertisement -


हेही वाचा – नियमित रेल्वे प्रवासी वाहतूक १२ ऑगस्टपर्यंत रद्द

- Advertisement -

यापूर्वी गुरुवारी उत्तर काश्मीरमधील सोपोरमध्ये सुरक्षा दलांनी लष्कर-ए-तैयबाच्या दोन अतिरेक्यांना ठार केलं होतं. या महिन्यात आतापर्यंत काश्मीर खोऱ्यात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ३२ हून अधिक दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं आहे. तर यावर्षी १०० हून अधिक दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं आहे. दरम्यान, २३ जून रोजी पुलवामाच्या बंडजू भागात सुरक्षा दलाने दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. या दरम्यान सीआरपीएफचा जवानही शहीद झाला. या व्यतिरिक्त, २१ जून रोजी जम्मू-काश्मीरच्या कुलगाम आणि श्रीनगरमध्ये स्वतंत्र चकमकीत पाकिस्तानीसह ४ दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं होतं.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -