घरक्राइमonline Ganja selling racket : ७०० किलोच्या जवळपास ऑनलाईन गांजा विक्री, पाच...

online Ganja selling racket : ७०० किलोच्या जवळपास ऑनलाईन गांजा विक्री, पाच जणांना अटक

Subscribe

गेल्या काही दिवसांपासून देशात विविध ई-कॉमर्स वेबसाईटच्या माध्यमातून अमली पदार्थांची खरेदी- विक्री सुरु असल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. मध्य प्रदेशच्या भिंड पोलिसांनी अशाच एका रॅकेटचा भांडाफोड करत आंध्र प्रदेशातून पाच आरोपींना अटक केली आहे. या आरोपींमध्ये एका बाप-लेकाचा समावेश आहे.

मध्य प्रदेशमध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी ऑनलाईन गांजा विक्रीच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला होता. यात कढीपत्त्याच्या नावाखाली चक्क गांजा या अमली पदार्थाची विक्री सुरु असल्याचे उघडं झाले होते. कढीपत्त्याच्या नावाखाली गांजा हा अमली पदार्थ विविध ई-कॉमर्स वेबसाईटच्या माध्यमातून मागवला जात होता. या प्रकरणी मध्य प्रदेशातून तीन तरुणांना अटक करण्यात आली होती. यानंतर आत्ता पुन्हा विशाखापट्टणममधून पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

- Advertisement -

अटक केलेल्या संशयित आरोपींमध्ये सीएच श्रीनिवास राव, त्याचा मुलगा मोहन राजू उर्फ राखी, जे.कुमारस्वामी, बी.कृष्णन राजू आणि सीएच व्यंकटेश्वर राव यांचा समावेश आहे. हे सर्व संशयित आरोपी विशाखापट्टणमचे रहिवासी आहेत. या आरोपांकडून आत्तापर्यंत ४८ किलो ड्राय गांजा जप्त करण्यात आल्याची माहिती विशाखापट्टणमच्या स्पेशल इन्फोर्समेंट ब्युरोचे जॉइंट डायरेक्टर एस.सतीश कुमार यांनी दिली. २१ नोव्हेंबरला ही कारवाई करण्यात आली आहे.
या कारवाईदरम्यान गांजासोबतचं कव्हर, बॉक्स, चिकटपट्टी आणि वजनकाटा असे पॉकिंगचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे. तपासादरम्यान मध्य प्रदेशमधून आरोपींचे दोन साथीदार सूरज पावैया आणि मुकुल जयस्वाय यांची नावे समोर आली आहे. या दोघांनी ई-कॉमर्स वेबसाईटवर विक्रेते म्हणून नावनोंदणी केली होती. यातून सुपरनॅचरल स्टीव्हिया ड्राय लीव्ह्ज’च्या (Supernatural stevia dry leaves) नावाने दोघांनी श्रीनिवासला गांजा पुरवला होता.

पोलिसांच्या माहितीनुसार, पावैया आणि जयस्वाल दुसऱ्या कंपनीचे जीएसटी नंबर वापरुन बाबू टेक्स नावाची कंपनी या ई-कॉमर्स वेबसाईटवर रजिस्टर केली होती. या कंपनीच्या माध्यामातून ते विशाखापट्टणमधून मागवलेला गांजाचा साठा मध्य प्रदेशात पुरवत होते. गेल्या आठ महिन्यांच्या कालावधीत दोघांनी सुमारे ६०० ते ७०० किलो गांजा विशाखापट्टणमधून मध्यप्रदेशला आणला असावा असा संशय सतीश कुमार यांनी व्यक्त केला आहे.

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -