घरताज्या घडामोडीधक्कादायक! आईकडून सात महिन्याच्या चिमुरड्याची ऑनलाईन विक्री ; काय आहे प्रकरण वाचा

धक्कादायक! आईकडून सात महिन्याच्या चिमुरड्याची ऑनलाईन विक्री ; काय आहे प्रकरण वाचा

Subscribe

हल्ली तंत्रज्ञानाच्या युगात सर्व काही सोयीस्कर झाले असून, ऑनलाइन खरेदी-विक्रीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. याशिवाय ऑनलाइन खरेदी-विक्रीच्या वेबसाइटचे जाळे देखील वाढले आहे. यासोबतच अनेक ऑनलाइन प्लॅटफॉर्म असे आहेत ज्याद्वारे लोक जुन्या वस्तूंची विक्री आणि खरेदी करू शकतात. अलीकडेच, एका महिलेने आपल्या सात महिन्यांच्या चिमुरड्याला विकण्यासाठी त्याचे फोटो ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर टाकले होते. मात्र, आपली चूक लक्षात येताच त्यांनी ते फोटो ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरुन काढून टाकले.

नक्की प्रकरण काय आहे ?

खरंतर ही महिला इंग्लंडची असून, या महिलेचे नाव लुसी बॅटल आहे. ही महिला बऱ्याच दिवसांपासून ऑनलाइन शॉपिंग करत होती. दरम्यान, नुकताच महिलेने घरात पडलेल्या सोफ्याचा फोटो काढून तो विकण्यासाठी सोशल मीडियावर टाकला. आश्‍चर्यकारक बाब म्हणजे या चित्रात सोफा कमी पण सोफ्यावर झोपलेल्या तिच्या मुलाचा चेहराच जास्त दिसत होता.महिलेने हे चित्र टाकताच लोकांना वाटले की ती महिला आपल्या सात महिन्यांच्या मुलाला विकत आहे. त्यामुळे  एकच खळबळ उडाली. त्या महिलेने सोफ्याच्या फोटोखाली लिहिलं होतं की, मला आज हे विकायचे आहे. सोफ्यासोबत तिने आपल्या सात महिन्यांच्या मुलाचा फोटो लावला होता हे त्या महिलेला फारसे माहीत नव्हते. यावर लोक कमेंट करू लागले. मात्र, महिलेने नंतर या सर्व प्रकरणाबाबत स्पष्टीकरण दिले की, हे फोटो चुकून पोस्ट करण्यात आले असून, तिला तिचे मूल विकायचे नाही तर सोफा विकायचा आहे.

- Advertisement -

हे ही वाचा – BWF World Tour Finals : पी.व्ही सिंधू आणि लक्ष्यचा उपांत्यफेरीत प्रवेश; चिराग-सात्विकच्या जोडीने घेतली माघार


 

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -