घरCORONA UPDATEयाला म्हणतात लग्न! मुलगा एकीकडे, मुलगी दुसरीकडे, भटजी तिसरीकडे आणि वऱ्हाड भलतीकडेच!

याला म्हणतात लग्न! मुलगा एकीकडे, मुलगी दुसरीकडे, भटजी तिसरीकडे आणि वऱ्हाड भलतीकडेच!

Subscribe

‘जब लड़का-लड़की राजी, तो क्या करेगा काजी।’  ही म्हण सगळ्यांनाच माहिती आहे. अविनाश आणि किर्तीवर ही म्हण अगदी फीट बसते. या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आता त्यांच्या लग्नाला लॉकडाऊनही आडवू शकलं नाही. अविनाश आणि किर्ती गेले साडे तीन वर्ष एकमेकांना ओळखतात. त्यांनी मध्यप्रदेशच्या एका ठिकाणी शाही लग्न करण्याचा निर्णय घेतला. ज्या लग्नात ८ हजाराहून अधिक लोकांना बोलवण्याचा विचार केला होता. पण कोरोनाने त्यांच्या या प्लॅनिंगवर पाणी पसरवलं. त्यामुळे त्यांनी आता डिजीटल लग्न करण्याचा निर्णय घेतला.

त्यांच लग्न गाजियाबादमध्ये व्हीडिओ कॉलवरून लग्न केलं. मुबईच्या एका पुजाऱ्याने आपल्या घरात लग्नाचे विधी केले. आणि इतर नातेवाईकांनी आपल्या आपल्या घरातून वधू – वराला आर्शिवाद दिला.

- Advertisement -

आम्ही एप्रिलमध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. मग लग्न कसही होऊ दे. मग लॉकडाऊनमुळे आम्ही ऑनलाईन लग्न करण्याचा निर्णय घेतला. आमच्या या निर्णयावर आम्ही दुसऱ्यांदा लग्न करण्याचा निर्णयही घेतला नाही. आमच्या आई- वडिलांनी थोडी नाराजी व्यक्त केली. पण त्यांना समजवल्यावर त्यांनीही मान्यता दिली.

आमच्या या लग्नात १० देशातील २०० लोकांनी सहभाग घेतला. नातेवाईकांना लग्नानंतर मिठाई आणि जेवण घरी होम डिलीव्हरी देण्यात आली. खरतर भारतात धूम धडाक्यात लग्न करण्याची प्रथा आहे. या लग्नाला नातेवाईक, गोड धोड पदार्थ्यांची रेलचेल असते. लग्नात मोठ्या प्रमाणावर खर्चही केला जातो आणि लग्नसोहळा किमान दोन ते तीन दिवस सुरू असतो.

- Advertisement -

तर सुशेन आणि किर्तीने देखील एप्रिलमध्ये जिम कॉर्बेटमध्ये डेस्टिनेशन वेडिंग करण्याचा निर्णय घेतला. पण लॉकडाऊनमुळे त्यांनी आपला निर्णय बदलला. त्यांनी शादी डॉट कॉमच्या मदतीने नातेवाईकांना इ निमंत्रण पाठवले.

या विषयी बोलताना सुनेश म्हणाला, आमच्या मित्रमंडळींनी आणि नातेवाईकांनी संगीत समारंभाची ऑनलाईन तयारी केली होती. अखेरीस ऑनलाईन लग्न करण्याचा निर्णय घेतला. या ऑनलाईन लग्नाला सोळा हजाराहून अधिक लोकांनी बघितला. आता हे दोघंडी लॉकडाऊन संपायची वाट बघत आहेत.


हे ही वाचा – Video – …आणि ७१ वर्षाच्या आजोबांना पोलिसांनी दिलं सरप्राईझ!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -