घरट्रेंडिंग२५० विषाणूच्या प्रजातींचाच मानवाला धोका, १० खरब विषाणू शोधणं बाकी

२५० विषाणूच्या प्रजातींचाच मानवाला धोका, १० खरब विषाणू शोधणं बाकी

Subscribe

विषाणू इतर प्रजातींसह जनुकांची देवाणघेवाण करतात, ज्यामुळे त्यांच्या गटांमध्ये स्पष्ट फरक करणं खूप अवघड होतं.

गेल्या दोन दशकांत सार्स, मर्स, इबोला, निपाहानंतर आता कोरोना विषाणूने जग हादरले आहे. एकामागून एक येणाऱ्या धोकादायक विषाणूंमुळे वैज्ञानिक हतबल झाले आहेत. वास्तविक, पृथ्वीवर सुमारे १० (खरब) ट्रिलियन विषाणू आहेत, ज्यांची नावे आपल्यालासुद्धा माहिती नाहीत. सिडनी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, सध्या या विविध विषाणूंपैकी केवळ सात हजार प्रजातींचेच नमुने गोळा केले गेले आहेत. जगातील सर्वात धोकादायक विषाणूंपैकी इबोला आणि कोविड-१९ चे संशोधन करणारे प्रसिद्ध वैज्ञानिक फोर्ट डायट्रिक म्हणतात की व्हायरस विषयी अजून बराच शोध लावायचा आहे. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत केवळ २५० प्रकारच्या विषाणूंनी मानवांवर आक्रमण केले आहे. म्हणजेच, वायरोस्फीयरमधील अगदी लहानसे अंश मानवांना संक्रमित करतात. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की प्राणी, वनस्पती, बुरशी आणि प्रोटोझोन्सना प्रभावित करणारे कोट्यवधी विषाणू आहेत.

कोरोनाच्या ३९ प्रजाती

कोरोना विषाणूच्या ३९ प्रजातींची ओळख पटली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने चीनच्या शोधानंतर सध्याच्या साथीच्या आजाराचे नाव ‘कोरोना विषाणू रोग २०१९’ किंवा ‘कोविड -१९’ असे ठेवले. या विषाणूत आणि सार्समध्ये अनुवांशिक समानता आहे. मार्चमध्ये, विषाणूंच्या वर्गीकरण विषयक आंतरराष्ट्रीय समितीने म्हटले आहे की हे दोन्ही विषाणू एकाच प्रजातीचे आहेत. सार्स पसरविणारा विषाणू सार्स-कोव्ह म्हणून ओळखला जातो म्हणून कोविड -१९ याला सार्स-कोव्ह-२ म्हटलं जातं.

- Advertisement -

हेही वाचा – नमाजच्या नावाखाली नियमांचं उल्लंघन करणं ‘हराम’ – मौलाना महमूद मदानी


१०० वर्षांपूर्वी मास्क आणि सामाजिक अंतर पद्धतीचा वापर

१९१८ मध्ये स्पेनमधून पसरलेल्या फ्लूच्या वेळीही परिस्थिती तशीच होती. लोकांना मास्क घालण्याचे निर्देश देण्यात आले होते आणि सामाजिक अंतर पाळले जात होते. जगभरात सुमारे ५ करोड लोकांचा मृत्यू झाला होता. १५ महिन्यांच्या कालावधीत केवळ भारतातच १.८ करोड लोक मरण पावले होते.

- Advertisement -

1918 pandemic
१९१८ मध्ये साथीच्या रोगाची साथ आली होती.

केवळ ६,८२८ प्रजातींनाच नाव

१७ व्या शतकाच्या अखेरीस विषाणूच्या शोधानंतर, हे आढळले की हे विषाणू रेबीज आणि इन्फ्लूएंझा सारख्या आजारांमुळे हे विषाणू आहेत. अनेक दशकांच्या परिश्रमानंतरही ६ हाजार ८२८ प्रजातींनाच नावे देण्यात आली आहेत. याउलट कीटकांच्या ३,८०,००० प्रजातींची नावं सांगण्यात कीटकशास्त्रज्ञांना यश आलं आहे.


हेही वाचा – Coronavirus: इराणच्या सभापतींना कोरोनाची लागण


समुद्रात १५ हजार विषाणू

अलिकडच्या वर्षांत, शास्त्रज्ञ जनुकीय सामग्री आणि प्रगत संगणक प्रोग्रामद्वारे विषाणूच्या नमुन्यांमधील जीन शोधतात. २०१६ मध्ये अमेरिकेतील ओहायो स्टेट युनिव्हर्सिटीचे तज्ज्ञ मॅथ्यू सुलिवॅन आणि त्याच्या सहकाऱ्यांनी समुद्राखालील १५,००० हून अधिक विषाणू ओळखले. त्यांना दोन लाख नवीन विषाणू सापडले.

जनुके अदलाबदल केल्यामुळे ओळखणे कठीण

विषाणूच्या क्षेत्रामध्ये उपस्थित प्रजातींचा वर्ग शोधणे अत्यंत आव्हानात्मक कार्य आहे. विषाणू इतर प्रजातींसह जनुकांची देवाणघेवाण करतात, ज्यामुळे त्यांच्या गटांमध्ये स्पष्ट फरक करणे खूप अवघड होते. यावर्षी फेब्रुवारीमध्ये हे दिसून आले की सरोवरामध्ये आढळलेल्या ७४ जनुकांपैकी ६८ जनुके कोणत्याही विषाणूमध्ये आढळली नाहीत.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -