भुवनेश्वर : देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्ष साजरा करत आहे. आपण प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत असाताना दुसऱ्या बाजूला ओदिशामध्ये जातीय विषमतेचे चित्र पाहायला मिळाले आहे. ओदिशाच्या केंद्रपाडा येथे एका जुन्या नागरी संस्थेने हजारीबगीचात फक्त ब्राह्मणांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचा अधिकार आहे, असे घोषित केले आहे. ही स्मशानभूमीमध्ये 1928पासून ब्राम्ह्यणांवर अंत्यसंस्कार करत आहे.
या केंद्रापाडातील स्मशानभूमी 154 वर्ष जूनी नागरी संस्था असून या स्मशानभूमीच्या मुख्य प्रवेश द्वारावर नुकतेच एक फलक लावले आहे. या फलकाविरोधात स्थानिक दलित नेते आणि ओदिशा दलित समाज जिल्हा युनिटचे अध्यक्ष नागेंद्र जेना यांनी समाजाने सोमवारी (20 नोव्हेंबर) सरकारला पत्र लिहले आहे. या पत्रता म्हटले की, “दीर्घकाळापासून नागरी संस्था ब्राम्हणांच्या स्मशानभूमीची देखभाल करण्यात आली आहे. याबाबत मी प्रशासनाला विनंती केली की, या स्मशानभूमीत कोणत्याही जातीचा विचार न करता पार्थिवावर येथे अंत्यसंस्कार करण्याची परवानगी द्यावी. पण या प्रकरणी कोणीही आमच्या विनंतीकडे लक्ष दिले नाही.”
हेही वाचा – Bihar Accident : जिल्हाधिकाऱ्याच्या गाडीने पाच जणांना चिरडले, बालकासह तिघांचा मृत्यू
‘फक्त ब्राम्हणांसाठी केंद्रपाडा शहरातील चालवली जाणारी स्मशानभूमी ही बेकायदेशीर आहे, असे सीपीएमचे जिल्हा युनिट अध्यक्ष गयाधर ढाल यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर नागरिक संस्था 1928 पासून ब्राम्हण स्मशानभूमी चालवत आहे’, असे केंद्रपाडा नगरपालिकेचे कार्यकारी अधिकारी प्रफुल्ल चंद्र बिस्वाल म्हणाले. ‘ब्राम्हण स्मशानभूमी आमच्या राज्यघटनेच्या कलम 14,19 आणि 21 नुसार हमी दिलेल्या सर्व जातींच्या लोकांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करते’, असे केंद्रपाडा वकील प्रदीप्ता गोचायत यांनी सांगितले आहे.