चिनी नवीन वर्षाच्या कार्यक्रमात अज्ञातांकडून अंदाधुंद गोळीबार; 10 जणांचा मृत्यू

पाच दिवसांपूर्वी कॅलिफोर्नियातील गोशेन येथे गोळीबाराची घटना घडली होती. या घटनेत सहा महिन्यांच्या मुलासह 10 जणांचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे अंदाधुंद गोळीबाराची घटना घडली आहे.

पाच दिवसांपूर्वी कॅलिफोर्नियातील गोशेन येथे गोळीबाराची घटना घडली होती. या घटनेत सहा महिन्यांच्या मुलासह 10 जणांचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे अंदाधुंद गोळीबाराची घटना घडली आहे. या गोळीबारात 16 जणांना गोळ्या लागल्या असून त्यापैकी 10 जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये चिनी नववर्षाचे आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात काही अज्ञातांनी गोळीबार केला. (Open Firing In Chinese New Year Event In America 10 Death)

मिळालेल्या माहितीनुसार, मॉन्टेरी पार्कमध्ये चिनी नववर्षाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी तेथे मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. दरम्यान, कार्यक्रमस्थळी अचानक गोळीबार सुरू झाला. ही घटना शनिवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास घडली. या गोळीबारात 16 जणांना गोळी लागली. ज्यामध्ये 10 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती मिळते.

या गोळीबारातील जखमी झालेल्या लोकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा हल्ला नेमका कुणी आणि कोणत्या कारणातून केला, याची अद्याप कोणतीही माहिती मिळू शकली नाही. स्थानिक पोलीस घटनेचा तपास करत आहेत. गोळीबारानंतर पोलिसांनी घटनास्थळी नाकाबंदी केली आहे.

मॉन्टेरी पार्कमध्ये चिनी नववर्षाचे आयोजन करण्यात आल्याने मोठ्या आवाजात गाणी लावण्यात आली होती. त्यामुळे गोळीबार झाल्याचे आसपासच्या लोकांना कळाले नाही. पण जेव्हा लोकांनी धावपळ करायला सुरुवात केली. त्यावेळी गोळीबार झाल्याचे समजले.


हेही वाचा – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या घरावर FBIचे छापे, महत्त्वाची कागदपत्रं केली जप्त