घरदेश-विदेश‘ऑपरेशन ब्ल्यू स्टार’ दिवशी स्वतंत्र खलिस्तानसाठी घोषणाबाजी

‘ऑपरेशन ब्ल्यू स्टार’ दिवशी स्वतंत्र खलिस्तानसाठी घोषणाबाजी

Subscribe

ऑपरेशन ब्ल्यू स्टारला ३५व्या स्मरणदिनी पंजाबमधील हरमिंदर साहिब येथे खलिस्तानच्या समर्थनार्थ खुलेआम घोषणाबाजी झाली असून काहींनी तलवारीही मिरवल्याचे पुढे येत आहे. काही ठिकाणी झटापटीही झाल्या आहेत. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून अमृतसर येथील सुवर्ण मंदिराची सुरक्षा वाढविण्यात आली आहे.

- Advertisement -

इंदिरा गांधी पंतप्रधान असताना ऑपरेशन ‘ब्ल्यू स्टार’ राबविण्यात आले होते. ६ जून १९८४ मध्ये भारतीय सेनेने तीन वर्षांपासून सुवर्णमंदिरात ठाण मांडून बसलेल्या फुटीरतावाद्यांचा बिमोड करण्यासाठी राबविण्यात आले होते. स्वतंत्र खलिस्तानची त्यांची मागणी होती. ऑपरेशन ब्ल्यू स्टारमुळे खलिस्तानवाद्यांचा सुवर्णमंदिरातून बिमोड झाला. मात्र त्याचा बदला म्हणून नंतर इंदिरा गांधींची हत्या करण्यात आली.

दरम्यान आज ऑपरेशन ब्ल्यू स्टारच्या स्मृतीदिनी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अमृतसर शहरातील अनेक भागांत पोलिसांनी फ्लॅग मार्च केला. तसेच संवेदनशील भागांत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे टेहळणीही केली जात आहे. विमानतळ, रेल्वे स्टेशन, तसेच शहराच्या प्रवेशद्वारांवर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -