घरताज्या घडामोडीऑपरेशन कावेरी : सुदानमधून भारतीयांची दहावी तुकडी मायदेशी रवाना

ऑपरेशन कावेरी : सुदानमधून भारतीयांची दहावी तुकडी मायदेशी रवाना

Subscribe

सुदानमध्ये सत्तेसाठी जोरदार युद्ध सुरू आहे. येथील सैन्य दल आणि निमलष्करी गटात संघर्ष सुरू आहे. या दरम्यान सुदानमध्ये अनेक भारतीय अडकून पडले आहेत. त्यामुळे येथील संघर्षात अडकलेल्या भारतीयांची सुटका करण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाकडून ऑपरेशन कावेरी राबवण्यात येत आहे. २५ एप्रिल रोजी २८७ जणांची पहिली तुकडी भारतात येण्यासाठी रवाना झाली होती. त्यानंतर आज भारतीयांची दहावी तुकडी मायदेशी रवाना झाली आहे.

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सांगितले की, भारतीय हवाई दलाच्या C-130J विमानाने पोर्ट सुदान येथून जेद्दाहसाठी उड्डाण केले आहे, ज्यामध्ये भारतीयांच्या १०व्या तुकडीतील १३५ लोकं आहेत.

- Advertisement -

केंद्रीय मंत्री व्ही. मुरलीधरन जेद्दाहमध्ये उपस्थित आहेत. व्ही मुरलीधरन यांनी यापूर्वी आपल्या एका ट्विटमध्ये सांगितले होते की, जेद्दाह विमानतळावर त्यांच्या ८व्या तुकडीचे भारतीयांनी स्वागत केले. या तुकडीमध्ये सुदानमधील भारतीय दूतावासाच्या कर्मचार्‍यांच्या कुटुंबातील सदस्यांचाही समावेश आहे. सुदानमध्ये जवळपास तीन हजार भारतीय राहत होते, त्यामुळे लवकरच भारताचे ऑपरेशन कावेरी यशस्वीपणे पूर्ण होईल, असा विश्वास आहे.

जेद्दाहून ३६२ भारतीय बंगळुरूला रवाना

- Advertisement -

परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी ट्विटमध्ये लिहिले की, ‘सुदानमधून बाहेर काढण्यात आलेल्या ३६२ भारतीयांना जेद्दाहहून बंगळुरूला पाठवताना खूप आनंद होत आहे. ही लोकं हक्की-पिक्की जमातीचे आहेत. सुदानमध्ये कर्नाटकातील हक्की पिक्की जमातीचे ३१ लोक अडकले होते, त्यांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. तसेच ३९२ भारतीय जेद्दाहून दिल्लीत येत आहेत. सुदानमधून भारतीयांच्या १० तुकड्या जेद्दाहला सुखरूप पोहोचल्या आहेत.

गेल्या दहा दिवसांपासून सुदानमध्ये लष्कर आणि निम लष्कर दलात संघर्ष सुरू आहे. या देशातील अनेक ठिकाणी बॉम्ब हल्ले करण्यात आले आहेत. सुदानमधील संघर्षात आतापर्यंत ४०० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. या संघर्षामुळे सुदानमधील अनेक भागात वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. यानंतर भारतीय सरकारने सुदान सरकारशी संपर्क करून ऑपरेशन कावेरी सुरू केले आहे. यासाठी भारत सरकारने सुदान संपर्क केल्यानंतर त्यांनी तीन दिवस युद्धबंदी घोषित केली आहे. येत्या काही दिवसांत सर्व ऑपरेशन कावेरीच्या अंतर्गत भारतीय नागरिकांन सुखरुप मायदेशी आणण्यात येणार आहे. या संघर्षामुळे सुदानमध्ये मोठ्या प्रमाणात मालमत्तेची हानी आणि जीवितहानी झालेली आहे. पहिल्या तुकडीत २७८ भारतीयांची सुटका करण्यात आली आहे. तर दुसऱ्या तुकडीत २४६ भारतात परतले आहेत.


हेही वाचा : ‘ऑपरेशन कावेरी’अंतर्गत सुदानमध्ये अडकलेले एवढे भारतीय परतले


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -