घरदेश-विदेश"ऑपरेशन कावेरी"ला मिळाली सौदी अरेबियाची साथ

“ऑपरेशन कावेरी”ला मिळाली सौदी अरेबियाची साथ

Subscribe

गेल्या दहा दिवसांपासून सुदानमध्ये लष्कर आणि निम लष्कर दलात संघर्ष सुरू आहे. या देशातील अनेक ठिकाणी बॉम्ब हल्ले करण्यात आले आहेत. सुदानमधील संघर्षात आतापर्यंत 400 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.

गेल्या दहा दिवसांपासून सुदानमध्ये लष्कर आणि निमलष्करी दलात संघर्ष सुरू आहे. या देशातील अनेक ठिकाणी बॉम्ब हल्ले करण्यात आले आहेत. सुदानमधील संघर्षात आतापर्यंत 400 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. या संघर्षामुळे सुदानमधील अनेक भागात वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. यानंतर भारत सरकारने सुदान सरकारशी संपर्क करून ऑपरेशन कावेरी सुरू केले आहे. यासाठी भारत सरकारने सुदान संपर्क केल्यानंतर त्यांनी तीन दिवस युद्धबंदी घोषित केली आहे.

येत्या काही दिवसांत ऑपरेशन कावेरीच्या अंतर्गत सर्व भारतीय नागरिकांना सुखरुप मायदेशी आणण्यात येणार आहे. या संघर्षामुळे सुदानमध्ये मोठ्या प्रमाणात मालमत्तेची हानी आणि जीवितहानी झालेली आहे. पहिल्या तुकडीत 278 भारतीयांची सुटका करण्यात आली आहे. तर दुसऱ्या तुकडीत 246 भारतात परतले आहेत. परंतु, ऑपरेशन कावेरी पार पाडण्यासाठी सौदी अरेबिया या देशाची मोठी मदत मिळाल्याने हे शक्य झाले आहे. ज्यामुळे सौदी अरेबिया आणि भारत देशाचे मैत्रीपूर्ण संबंध पुन्हा एकदा नव्याने समोर आले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – सुदानमधील भारतीय नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी ‘ऑपरेशन कावेरी’ सुरू

सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत मायदेशात परत आणण्यासाठी ऑपरेशन कावेरी सुरु करण्यात आले आहे. सुदान देशाला लागून असलेला लाल समुद्र ओलांडल्यानंतर सौदी अरेबिया या देशातील जेद्दा शहर लागतं. याच शहरात असलेल्या जेद्दा विमानतळावर सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांना आणले जात आहे. सोयीसुविधा आणि भारतासोबत असलेल्या चांगल्या संबंधांमुळे भारताने या ऑपरेशनसाठी सौदीची निवड केली असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु, अशा कठीण प्रसंगी भारताला सौदीने काही पहिल्यांदाच मदत केलेली नाही तर याआधी 2015 मध्ये देखील झालेल्या युद्धात सौदीने आपल्याला मदत केलेली आहे.

- Advertisement -

काय घडलं होतं 2015 ला?
2015मध्ये सौदी अरेबिया आणि यमन या देशामध्ये युद्ध सुरु होते. या युद्धात साडे चार हजार भारतीयांना सुरक्षितरीत्या परत आणण्यात आले होते. तसेच 41 देशांच्या नागरिकांना सुद्धा त्यावेळी भारतात आणण्यात आले होते. याबाबत 2018 मध्ये दिवंगत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी सांगितले की, 2015 मध्ये सौदी आणि यमनमध्ये सुरु असलेल्या युद्धात यमनमध्ये आकाशातून बॉम्ब पडत होते, जमिनीवर सैन्य होतं आणि पाण्यातही संकट होते. या परिस्थितीत भारतीयांना वाचवण्याचे मिशन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदीचे किंग सुलमान बिन अब्दुल अजीज यांना फोन केला आणि भारतीयांना सुखरूप आणता यावे यासाठी सात दिवस युद्ध थांबवण्याची विनंती केली, यानंतर सौदीने विचार करण्यासाठी एक तास मागितला. एका तासानंतर सौदीच्या राजाचा फोन आला आणि आठवडाभर दररोज दोन तास युद्धविराम देण्याची तयारी दर्शवली. यानंतर तत्कालीन माजी परराष्ट्र राज्यमंत्री व्हीके जनरल सिंह यमनला गेले आणि बचावकार्य सुरू झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -