स्वातंत्र्यदिनी शाळेच्या आवारात बसून ओढला गांजा, शिक्षण अधिकारीही चक्रावले

बाडमेर – स्वातंत्र्य दिनानिमित्त राजस्थानच्या एका सरकारी शाळेत गांजा वाटण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. शाळेत बसून काही लोक गांजा घेत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर याप्रकरणी सखोल चौकशी करण्याचे आदेश शिक्षण अधिकाऱ्यांनी दिले आहेत. (Opium Served In Government School Of Barmer in rajasthan On Independence Day)

हेही वाचा – विमानात सिगारेट ओढणे ‘या’ युट्यूबरला पडले महागात; एफआयआर दाखल

राजस्थान येथील बाडमेर जिल्ह्यातील गुडामालानी उपखंड येथील रावली नाडी शाळेतील हा प्रकार आहे. या व्हिडीओमध्ये शाळेचा परिसर दिसत आहे. शाळेतील वर्गांच्या आवारात काही लोक बसून गांजा वाटत असल्याचं स्पष्ट दिसत आहे. तसेच आजूबाजूला काही विद्यार्थीही दिसत आहेत.हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शिक्षण अधिकारी शाळेत पोहोचले. मात्र, तोपर्यंत तिथे कोणीही राहिलं नव्हतं. त्यामुळे याप्रकरणी सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

या शाळेतील एकूण चार व्हिडीओ समोर आले आहेत. एका शाळेतील आवारात काही लोक बसले आहेत. एक व्यक्ती खुर्चीत बसला आहे. तो पैशांची देवाण-घेवाण करत आहे. तसंच, व्याजाची रक्कम जोडण्याचाही संवाद त्यांच्यात होत आहे. तसंच, एका व्हिडीओमध्ये एक सरकारी शिक्षकही दिसत आहे. तो रजिस्टरमध्ये तेथील उपस्थित लोकांची सही घेत आहे. तसंच, उरलेल्या पैशांतून गांजा आणला असल्याचंही तेथील काही लोक म्हणत आहेत.

हेही वाचा – Video : डोमिनोज पिझ्झाच्या पीठावर ठेवलेय टॉयलेटचे ब्रश; फोटो व्हायरल होताच युजर्सचा संताप

शाळेच्या सारख्या पवित्र ठिकाणी मद्यपान, धुम्रपान होत असेल तर विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधारात आहे. शाळा आणि आजूबाजूच्या परिसरात असे प्रकार घडू नयेत अशी मागणी अनेकांकडून करण्यात येत आहे.