Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश "5 वर्षं दिली तरीही विरोधकांची तयारी नाही", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टोला

“5 वर्षं दिली तरीही विरोधकांची तयारी नाही”, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टोला

Subscribe

नवी दिल्ली | “5 वर्ष दिली तरीही विरोधकांची तयारी नाही”, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लगावला. काँग्रेसचे आसाममधील खासदार गौरव गोगोई यांनी 26 जुलैला लोकसभेत मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला. यावर 8 आणि 9 ऑगस्ट या दोन दिवशी या प्रस्तावावर लोकसभेत चर्चा सुरू होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अविश्वास प्रस्ताव आण्यापूर्वी विरोधकांनी अभ्यास करावा?, लोकसभेत मांडण्यात आलेल्या प्रत्येक विधेयकाला विरोधकांनी विनाकारण विरोध केल्याचा आरोप पंतप्रधानांनी केला आहे.

लोसभेत अविश्वास प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलताना म्हणाले, “या अविश्वासवर तुम्ही कशा पद्धतीने चर्चा केली. हे मी दोन दिवसांपसून बघत आहे. फिल्डिंग विरोधकांनी लावली पण चौकार आणि षटकार आमच्या येथून लागत आहेत. विरोधक अविश्वास प्रस्तावर ‘नो बॉल’ होत आहे. इकडे सत्ताधाऱ्यांकडून जोरदार बॅटिंग सुरू आहे. आणि तिकडे नो बॉलवर नॉ बॉल होत आहे. मला विरोधकांना ऐवढेच विचारायचे आहे की, तुम्ही तयारी करू का येत नाही?, तुम्ही थोडी मेहनत घ्या. मी तुम्हाला मेहनत करण्यासाठी 5 वर्ष दिले आहेत. मी तुम्हाला 2018 मध्ये सांगितले होते की, 2023मध्ये या तुम्ही पाच वर्ष देखील व्यवस्थितीत अभ्यास केला नाही. तुम्ही ही काय असवस्था झाली आहे? तुमच्या लोकांचे काय दारिद्र्य आहे”, अशा शब्दात पंतप्रधानांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे.

- Advertisement -

पंतप्रधानांनी काँग्रेसचा गट नेता अधीर रंजन चौधरी यांच्यावर बोलताना म्हणाले, “या अविश्वास ठरावावर मला काही विचित्र गोष्टी दिसून आल्या. जे कधी ऐकले नाही, कधी बघितले नाही आणि कधी कल्पना देखील करू शकत नाही नाही. विरोधकांच्या नेत्याचे बोलणाऱ्या नेत्यांच्या यादीत नाव नव्हते. यापूर्वीचे उदाहरण पाहिले तर कळते की, 1991 मध्ये अटलबिहारी वाजयपेयी सरकार विरोधात अविश्वास प्रस्तावर आला. तेव्हा शरद पवार हे विरोधीपक्षाचे नेतृत्व करत होते. शरद पवारांनी चर्चेचे नेतृत्व केले. 2003 मध्ये अटल बिहारी वाजयपेयीची सरकारमध्ये सोनिया गांधी या विरोधकांच्या नेत्या होत्या. सोनिया गांधींनी अविश्वास प्रस्ताव ठेवला. 2018 मध्ये मल्लिलकार्जुन खर्गे हे विरोधकांचे नेता होते. तेव्हा खर्गेंनी प्रस्ताव ठेवून चर्चा केली.”

हेही वाचा – PM Narendra Modi : शतकात अनेक संधी, या काळाचा प्रभाव हजारो वर्षांपर्यंत राहील – मोदी

विरोधक नेहमीच गुड़ गोबर करना…

- Advertisement -

यंदा काँग्रेसचा गट नेते अधीर रंजन चौधरी यांची जी अवस्था झाली. चौधरींना त्यांच्या पक्षाने बोलण्याची संधीच दिली नाही. विरोधकांनी गोंधळामुळे त्यांच्या विरोधी पक्ष नेत्याला बोलण्याचा वेळ संपली. पण आज अधीर रंजन चौधरींना बोलण्याची संधी दिली. तेव्हा सुद्धा विरोधकांनी ‘गुड़ गोबर करना’, करण्यात पारंगत आहेत”, असे म्हणत पंतप्रधानांनी विरोधकांवर निशाणा साधला. तेव्हा सत्ताधाऱ्यांनी सभागृहाती बॅनच वाजवून पंतप्रधानांच्या मिश्किल टीकेला सात दिली.

हेही वाचा – विरोधकांकडे सिक्रेट वरदान आहे, ते ज्यांचं वाईट इच्छितात त्यांचे भले होते; मोदींचा कॉंग्रेसवर हल्लाबोल

काँग्रेसकडून चौधरींचा अपमान 

पंतप्रधान पुढे म्हणाले, “अधीर रंजन चौधीर यांना बाजूला का? केले हेच कळत नाही. काय माहिती कलकत्त्यातून फोन आला असेल”, असे म्हणत मोदींनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली. “काँग्रेस सतत अधीर रंजन चौधरी यांचा अपमान करते. मग कधी निवडणुकीच्या नावावर त्यांना काही काळासाठी विरोधी पक्ष नेते पदावरून हटवून टाकते. आम्ही अधीर रंजन चौधरी यांच्या प्रति पूर्ण संवेदना व्यक्त करतो”, असे पंतप्रधान म्हणाले.

 

- Advertisment -