घरदेश-विदेशअदानी मुद्द्यावरून विरोधकांचा ईडी कार्यालयावर मोर्चा, टीएमसी-राष्ट्रवादी मोर्चात सहभागी नाही

अदानी मुद्द्यावरून विरोधकांचा ईडी कार्यालयावर मोर्चा, टीएमसी-राष्ट्रवादी मोर्चात सहभागी नाही

Subscribe

नवी दिल्ली : अदानी मुद्द्यावरून केंद्र सरकारला कोंडीत पकडण्यासाठी विरोधक गेल्या काही दिवसांपासून संसदेत अदानीशी संबंधित मुद्दे सातत्याने उपस्थित करत आहेत. मात्र, केंद्र सरकार अदानी प्रकरणावर लक्ष देत नसल्यामुळे विरोधी पक्षाच्या खासदारांनी दिल्लीत निवेदन देण्यासाठी संसद ते ईडी कार्यालयापर्यंत आज (१५ मार्च) मोर्चा काढला आहे. मात्र, या निषेध मोर्चात राष्ट्रवादी आणि टीएमसी पक्ष सहभागी झाला नसल्याचे पाहायला मिळाले.

संसद ते ईडी कार्यालयापर्यंत निघालेला मोर्चा विजय चौकात पोलिसांकडून अडवण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांनी विरोधी पक्षाच्या खासदारांना सांगितले की, कलम 144 सीआरपीसी लागू असल्याने तुम्ही पुढे मोर्चा काढू शकत नाही, तसेच याठिकाणी कोणत्याही हालचालींना परवानगी नाही.

- Advertisement -

बँका उद्ध्वस्त झाल्या – मल्लिकार्जुन खर्गे
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी निषेध मोर्चादरम्यान सांगितले की, अदानी घोटाळ्याप्रकरणी आम्ही सर्वांनी ईडीच्या संचालकांची भेट घेण्यासाठी मोर्चा काढला होता. मात्र सरकार अदानी प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे त्यांनी आम्हाला विजय चौकाजवळ थांबवले आहे. अदानीने लाखो रुपयांचा घोटाळा केला आहे. त्यामुळे एलआयसी, एसबीआय आणि इतर बँका डबघाईला आल्या आहेत, मात्र सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे.

निषेध मोर्चावेळी मल्लिकार्जुन खर्गे वक्तव्य करताना

कोटी रुपयांची संपत्ती असलेल्या व्यक्तीला पंतप्रधानकडून प्रोत्साहन
ज्यांच्याकडे पूर्वी कमी संपत्ती होती, अशा व्यक्तींना सरकारी मालमत्ता खरेदी करण्यासाठी सरकार पैसे देत आहे. पण आता 13 लाख कोटी रुपयांची संपत्ती असलेल्या व्यक्तीला पंतप्रधान प्रोत्साहन देत आहेत. हे कसे घडले? याला कोण जबाबदार आहे? पैसे कोण देत आहे? पीएम मोदी आणि अदानी यांच्यात नक्की काय संबंध? याची चौकशी व्हायला हवी, असे वक्तव्य मल्लिकार्जुन खर्गे यांनी निषेध मोर्चावेळी केले.

- Advertisement -

आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न
आम्ही 17-18 राजकीय पक्षांच्या सर्व खासदार मिळून आज निषेध मोर्चा काढला, परंतु हा मोर्चा पोलिसांकडून अडवण्यात आला आहे. आज आम्हाला जाणून घ्यायचे आहे की, अदानीने अडीच वर्षांत लाखो आणि करोडो रुपये कसे कमवले आहेत. आम्ही 200 आहोत आणि आम्हाला थांबवण्यासाठी या ठिकाणी 2000 पोलीस आहेत, त्यामुळे सरकारकडून आमचा आवाज दाबायचा प्रयत्न होत असल्याचेही मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले.

मोर्चा आवश्यक असल्याचे संजय राऊत मत
हा मोर्चा आवश्यक असून ईडी कार्यालयाकडे या मोर्चाद्वारे आमचे निवेदन असेल, असे उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत म्हणाले. देशातील भाजप सरकार ज्या प्रकारे आपल्या राज्यातील विरोधकांना टार्गेट करत आहे, हे बघितल्यावर असे वाटते की, सत्तेतील लोक दुधात धुतले आहेत. ते आमच्या सारख्या प्रश्न विचारणाऱ्यांनाच टार्गेट करतात.

जेपीसीच्या मागणीवर विरोधक ठाम
अदानी प्रकरणाची चौकशी करण्यासाठी काँग्रेससह विरोधी पक्ष जेपीसीची मागणी करत आहेत. त्यामुळे सध्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही विरोधी पक्ष अदानींच्या मुद्द्यावरून आवाज उठवत आहेत. अदानी प्रकरणाला काँग्रेसचा सक्रिय विरोध असून या मुद्द्यावरून काँग्रेस सरकारला घेरण्याचा प्रयत्न आहे. अदानी प्रकरणाच्या निषेधार्थ विविध राज्यांतील काँग्रेस समित्या निषेध मोर्चे काढत आहेत. त्याचवेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीही सभागृहात मोदी सरकारवर सातत्याने निशाणा साधला आहे.

एलपीजी दरवाढीवरून टीएमसीने मोदींकडे मागितले उत्तर
एलपीजी दरवाढीवरून तृणमूल काँग्रेसने स्वतंत्रपणे संसद संकुलातील गांधी पुतळ्यासमोर धरणे आंदोलन करत सरकारला जाब विचारला आहे. यावेळी टीएमसीच्या खासदारांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली आहे. या दरवाढीविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर देण्याची मागणीही यावेळी त्यांच्याकडून करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -