घरताज्या घडामोडीविरोधी पक्षांच्या शिष्टमंडळानं घेतली राष्टपतींची भेट; शरद पवार, राहुल गांधी उपस्थित

विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळानं घेतली राष्टपतींची भेट; शरद पवार, राहुल गांधी उपस्थित

Subscribe

शेती कायद्यांच्या विरोधात लाखो शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करत असताना देशातील प्रमुख विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळाने आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. कृषी कायद्यांच्या विरोधातल्या देशातल्या भावना आम्ही राष्ट्रपतींना कळवल्या असून शेतकऱ्यांच्या हितासाठी हे कायदे मागे घेण्यात यावेत, अशी मागणी आम्ही राष्ट्रपतींकडे केल्याचं या शिष्टमंडळातल्या नेत्यांनी भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितलं. यावेळी काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, भाकपचे नेते सिताराम येचुरी आदी प्रमुख नेते उपस्थित होते.

‘तिन्ही विधेयके घाईत मंजूर करण्यात आली. या आंदोलनात राजकीय पक्ष थेट सहभागी नाहीत. कायद्यात कुठेही msp चा उल्लेख करण्यात आलेला नाही. त्यामुळे हे कायदे मागे घ्यावेत यासाठी राष्ट्रपतींनी हस्तक्षेप करावा अशी विनंती करण्यासाठी आम्ही राष्ट्रपतींची भेट घेतली’, असं शरद पवार यावेळी म्हणाले.

- Advertisement -

..तर मग शेतकरी रस्त्यावर का उतरलेत? – राहुल गांधी

दरम्यान, यावेळी राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली. ‘आम्ही राष्ट्रपतींना सांगितलं की हे कायदे मागे घ्यायला हवेत. ज्या पद्धतीने ही विधेयके पारित करण्यात आली, त्याबद्दल आम्ही राष्ट्रपतींना सांगितलं. हा शेतकऱ्यांचा अपमान आहे. शेतकऱ्यांचा आता सरकारवर विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे लाखो शेतकरी अहिंसात्मक मार्गाने रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांनीच या देशाचा पाया घातला आहे. तो दिवसभर या देशासाठी काम करतो. पण ही विधेयके शेतकरी विरोधी आहेत. पंतप्रधान म्हणतात की ही विधेयके शेतकऱ्यांच्या हिताची आहेत. पण मग शेतकरी रस्त्यावर का उतरला आहे? कारण या विधेयकांचं ध्येय हे देशातल्या शेतकऱ्यांना पंतप्रधानांच्या मित्रांच्या हाती सोपवण्याचं आहे. पण सरकारने असा विचार करू नये की शेतकरी घाबरतील आणि निघून जातील’, असं राहुल गांधी यावेळी म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -