Sunday, September 19, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश राष्ट्र मंचाच्या झेंड्याखाली विरोधक एकत्र येणार; उद्या नवी दिल्लीत पवारांच्या निवासस्थानी बैठक

राष्ट्र मंचाच्या झेंड्याखाली विरोधक एकत्र येणार; उद्या नवी दिल्लीत पवारांच्या निवासस्थानी बैठक

या बैठकीला १५ पक्षांचे नेते उपस्थित राहणार

Related Story

- Advertisement -

देशाच्या राजकारणात नव्या घडोमोडींना वेग आला आहे. उद्या नवी दिल्लीला विरोधकांची बैठक होत आहे. ही बैठक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ६ जनपथ या निवासस्थानी येथे उद्या संध्याकाळी ४ वाजता होणार आहे. या बैठकीला १५ पक्षांचे नेते राष्ट्र मंचाच्या झेड्याखाली एकत्र येतील अशी माहिती समोर येत आहे.

दरम्यान, शरद पवार आणि निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्यात शरद पवारांच्या निवासस्थानी बैठक सुरु आहे. या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असाताना नवी माहिती समोर येत आहे. उद्या संध्याकाळी ४ वाजता विरोधकांची शरद पवार यांच्या निवासस्थानी बैठक होणार आहे. माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी स्थापन केलेल्या राष्ट्र मंचाच्या झेंड्याखाली ही बैठक होणार आहे. आरजेडीचे मनोज सिन्हा, आपचे संजय सिंह यासारखे काही विरोधी पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत.

काँग्रेस विरहित आघाडी?

- Advertisement -

तथापि, काँग्रेसचा कुणी यामध्ये असणार की नाही याबद्दल अजून स्पष्टता नाही. जर यामध्ये काँग्रेस नसेल तर याचा अर्थ देशात नव्या आघाडीची चाचपणी सुरु आहे का? असा निघू शकतो. युपीएचं अध्यक्षपद शरद पवारांकडे असावं अशी चर्चा होती. युपीएच्या अध्यक्षपदाची चर्चा काँग्रेसला वगळून करता येणार नाही. जर शरद पवार यांच्या बैठका काँग्रेस सोडून विरोधकांसोबत होत असतील तर याचा अर्थ युपीएला पर्याय म्हणून तीसरी आघाडी देशात उभी राहतेय का? युपीए केवळ काँग्रेसकडे सोपवून तीसरी आघाडी करण्याच्या तयारीत शरद पवार असल्याचं त्यांच्या बैठकांमधून दिसत आहे.

 

- Advertisement -