Corona Vaccine : भारत सहा देशांना पुरवणार कोरोना लसीचे डोस

शेजारील देशांना उद्यापासून(२१ जानेवारी) पुरवले जाणार लसीचे डोस

orona vaccin

कोरोना विषाणुचा वाढती साथ रोखण्यासाठी सर्वच देश प्रयत्न करत आहेत. अनेक देशात कोरोना प्रतिबंधनात्मक लसीकरण मोहिलेला सुरुवात झाली आहे. दरम्यान भारताकडून शेजारील सहा देशांना कोरोना लसीचे डोस पुरण्यात येणार आहे. या देशांमध्ये भूतान, मालदीव, बांग्लादेश, नेपाळ, म्यानमार, सशेल्स देशांचा समावेश आहे. देशाचे पंतप्रधान मोदींनीही जागतिक समुदायांच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी भारताकडे एका विश्वसनीय सहकारी म्हणून पाहिले जाते ही कौतुकाची बाब आहे. असे म्हटले होते. त्यामुळे भारताकडून शेजारील मित्र राष्ट्रांना कोरोना लसीकरणाची मदत केली जात आहे. त्यामुळे उद्यापासून(२१ जानेवारी) लसीकरणाचे डोस पुरवले जाणार आहे.

भारताकडून शेजारील बांग्लादेशपासून या लसीकरण पुरवठ्याला सुरुवात होणार आहे. बांग्लादेशला २० लाख लसीचा साठा दिला जाणार आहे.  भारताकडून देशांतर्गत गरज लक्षात घेऊन येणाऱ्या काही काळात सहकारी देशांना टप्प्याटप्प्याने लसीकरणाचे टोस पुरवले जाणार आहे. असे परराष्ट्र मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच काही दिवसांत श्रीलंका, अफगाणिस्तान, मॉरीशिअस देशांना लसीकरण साठा पुरवण्याच्या नियमक मंजुरीच्या प्रतिक्षेत आहे.